लव्ह जिहाद प्रकरणी सलमानला अटक; आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन केली लाखोंची वसुली!

    11-May-2024
Total Views |
Love Jihad Jaipur

जयपूर : 'लव्ह जिहाद' प्रकरणी सलमान खान नावाच्या व्यक्तिला राजस्थानच्या जयपूरमधून पोलिसांनी अटक केली आहे. तो ८वी नापास असून मोबाईलचे दुकान चालवायचा. दुकानात येणाऱ्या मुलींना ओळख लपवून तो फसवत असे आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. अशाच एका प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सलमान खानने आपली ओळख लपवून ५-६ वर्षांपूर्वी एका मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, त्यानंतर तिच्याशी संबंध ठेवले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या आधारे तो वर्षानुवर्षे एका मुलीकडून पैसे उकळत होता. त्यासोबतच सलमानने मुलीच्या नावाने स्कूटरही घेतली होती. तसेच जबरदस्तीने सोबत तिचे अपहरण करण्यात आले. ज्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडून करण्यात आलेल्या तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण जयपूरच्या शिप्रा पथ पोलीस स्टेशन परिसरातील आहे, जो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरचा परिसर आहे. येथे मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवणाऱ्या सलमानला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. जयपूर येथील एका मुलीला सोबत घेऊन तो पळून गेला. त्याने ओळख लपवून तरुणीला फसवले आणि बलात्काराचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी ही मुलीला दिली.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान अजमेरचा रहिवासी असून जयपूरमध्ये मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवतो. त्याने २९ एप्रिल रोजी एका मुलीचे अपहरण करून तेथून पळ काढला होता. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि दोघांनाही दिल्लीतून ताब्यात घेतले. तपासादरम्यान समोर आले आहे की, सलमानने याआधी आणखी ३-४ हिंदू महिलांनाही अशाच प्रकारे जाळ्यात अडकवले होते. पोलिसांनी सलमान खानचा मोबाईल जप्त केला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे.

शिप्रा पथ पोलिस स्टेशनचे एसएचओ अमित कुमार यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून आठवी अनुत्तीर्ण सलमान अजमेरचा रहिवासी असल्याचे सांगितले. त्याने ५ ते ६ वर्षांपासून तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. त्याने मुलीला तिच्या नावावर एक स्कूटर विकत घ्यायला लावली होती.

या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात पीडितेचे जबाब नोंदवले असून, न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी सलमान खानची रिमांडवर चौकशी करण्यात येत आहे. सलमान खानने अनेक हिंदू मुलींसोबत हे कृत्य केल्याची माहिती मिळत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, त्याच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी करण्यात येत असून, त्यानंतर इतर तथ्य समोर येईल.'लव्ह जिहाद' प्रकरणी सलमान खानला राजस्थानच्या जयपूरमधून पोलिसांनी अटक केली आहे.