उत्तर मुंबईत पायाभूत आणि आरोग्य सेवांवर भर - पीयूष गोयल

    11-May-2024
Total Views |
piyush goyal
 
मुंबई,: उत्तर मुंबईचा कायाकल्प करण्यासाठी येत्या काळात येथील पायाभूत आणि आरोग्य सेवांवर भर देत अनेक अद्ययावत सुविधा दिल्या जाणार असल्याचे आश्वासन उत्तर मुंबई लोकसभा मतदासंघांतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी दिले.
 
कांदिवली (पुर्व) येथील गौतम नगर येथून जन आशीर्वाद रथासह सुरू झालेल्या नमो यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 'जो राम को लाये हैं, हम उनको लायेंगे' असे लिहिलेले फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
 
उत्तर मुंबईची उत्तम मुंबई करण्याचा संकल्प मी केला आहे. सर्वच क्षेत्रात अनेक नवनव्या सुधारणा करण्याचा आमचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभदायी अनुभव नागरिकांनी घेतला आहे. येत्या काळात त्यात आणखी नव्या योजनांची भर पडणार असल्याचे पीयूष गोयल यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी नमो यात्रेत त्यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते.