महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल बैस यांची भेट घेतली

विविध आर्थिक सामाजिक शैक्षणिक विषयावर भेटीदरम्यान मंथन

    11-May-2024
Total Views |

medc
 
 
मुंबई: महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ (Maharashtra Economic Development Council) चे अध्यक्ष अतुल शिरोडकर व माजी अध्यक्ष रविंद्र बोरटकर यांनी ३ मे रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली आहे. राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन अतुल शिरोडकर व रविंद्र बोरटकर यांनी स्वागत केले. या भेटीदरम्यान विविध सामाजिक आर्थिक पातळ्यांवर महत्वपूर्ण चर्चा झाली आहे.
 
देशातील कौशल्य विकास व त्यासंदर्भात एमईडीसीने घेतलेला पुढाकार याबद्दल विस्तृत माहिती त्यांनी या भेटीदरम्यान राज्यपालांना दिली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक प्रगतीपथावर नेण्याच्या प्रवासात त्यांनी केलेले उपक्रमाचे राज्यपालांना विवेचन केले आहे.कारपेंटरी, क्राफ्टमनशिप, व इतर अंतर्भूत कौशल्यांना असलेले महत्व व या कौशल्य विकासाला वाढलेली मागणी लक्षात घेता संस्थेचे उपक्रम त्यांनी भेटीत राज्यपालांना समजावून सांगितले. भारत व देशाबाहेर कला कौशल्याला असलेली संधी व त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे चालू असलेले उपक्रम याबद्दलची चर्चाही यात झाली आहे.
 
विशेषतः एमईडीसीची मुख्य उद्दिष्टे, एमईडीसीचे बहुआयामी उपक्रमांचे सर्वसमावेशक धोरण आणि तयार करण्यात व शिफारसीत संस्थेची महत्वाची भूमिका याबाबत राज्यपालांना निवेदन एमईडीसीचीचे अध्यक्षांनी दिले आहे.रवींद्र बोरटकर यांनी कोकण विकास मंथन, अष्टविनायकाचे टेम्पल टाउन डेव्हलपमेंट, मुंबई कन्व्हेन्शन व्हिजिटर्स ब्युरो आणि फिशटेक, ग्रीन हायड्रोजन, ॲग्रोव्हिजन वरील परिषदा यांसारख्या एमईडीसीद्वारे हाती घेतलेल्या महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांची माहिती दिली. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये नावीन्य आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी एमईडीसीची वचनबद्धता यामध्ये अधोरेखित केली गेली.
 
उपाध्यक्ष, आशिष गर्दे यांनी गेल्या १२ वर्षांपासून परिषदेचे आयोजन करून आणि स्टार्टअप्सचे पालनपोषण करून आणि उद्योजकीय प्रयत्नांना चालना देऊन एमएसएमईला पाठिंबा देण्याच्या एमईडीसीच्या पूर्व कामगिरीवर भर दिला.
 
यादरम्यान एमईडीसीच्या महासंचालक श्रीमती शीतल पांचाळ यांनी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता माइंडसेट कार्यक्रम आणि कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एमईडीसीच्या पुढाकारांबद्दल सांगितले.