शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याच्या अखेरीस बाजाराची वापसी ! सेन्सेक्स २६०.३० अंशाने वाढत ७२६६४.४७ व निफ्टी ९७.७९ अंशाने वाढत २२०५५.२० पातळीवर

मेटल, हेल्थकेअर समभागात वाढ तर बँक निर्देशांकात घसरण काय

    10-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तीन दिवसांच्या पडझडीनंतर आठवड्याची अखेरीस बाजारात वाढ झाली आहे. आज बाजारातील गुंतवणूकदारांची सकारात्मकता कायम असून बाजारातील कंसोलिडेशनची प्रकिया संपत आली आहे का हा प्रश्न पडत आहे. एकूण बाजारातील रॅली कायम राहत मिडकॅप, स्मॉलकॅप, लार्जकॅप तिन्ही निर्देशांकात वाढ झाल्याने निर्देशांक वरच्या बाजूला कायम राहिला आहे. परिणामी आज बाजारात वाढ झाल्याने बाजारात 'रिकवरी' सुरु झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांकात २६०.३० अंशाने (०.३६%) वाढ होत ७२६६४.४७ पातळीवर पोहोचले आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ९७.७९ अंशाने (०.४४%) वाढत २२०५५.२० पातळीवर पोहोचला आहे.
 
एस अँड पी सेन्सेक्स बँक निर्देशांकात मात्र ८७.५८ अंशाने घट होत बँक निर्देशांक ५४१५३.३५ पातळीवर पोहोचले आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात ६६.८० अंशाने घट होत बँक निर्देशांक ४७४२१.१० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई (BSE) मधील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८१ व ०.८० टक्क्यांनी वाढ झाली आहे.एनएसई (NSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.९४ व ०.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्षेत्रीय बँक निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये निफ्टी बँक (०.१४%) निफ्टी आयटी (०.८२%) पीएसयु बँक (०.२९%) समभागात झालेली घसरण वगळता बाकी निर्देशांकात वाढ कायम राहिली आहे.सकाळच्या सत्राप्रमाणेच मेटल (१.५४%) मधील वाढ कायम राहिली असून फार्मा (०.९४%) हेल्थकेअर (१.०२%) एफएमसीजी (१.१९%) मिडस्मॉल हेल्थकेअर (१.३०%) या समभागात वाढ झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९३१ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २१९४ समभाग (Shares) वधारले असून १६०७ समभागात घसरण झाली आहे. ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ ११७ समभागात झाली तर ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण ४५ समभागात झाली आहे. आज एकूण २५७ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २८२ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहे.
 
एनएसईत आज एकूण २७०३ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १६६० समभाग वधारले असून ९२६ समभागात घसरण झाली आहे. त्यातील एकूण ५२ समभाग ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकनात राहिले आहेत तर ३५ समभागात ५२ आठवड्यातील मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण आज ८८ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ७८ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation )३९६.६२ लाख कोटींचे पोहोचले आहे तर एनएसईत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल बाजार भांडवल ३९३.०७ लाख कोटींवर पोहोचले आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत प्रति डॉलर ८३.४८ रुपयाला स्थिरावले आहे. बाजारातील डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ५ पैशाने वाढली होती. डॉलर कमजोर होताना रुपया मजबूत झाल्याने अखेर रुपया वाढला होता.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील डॉलरची किंमत घटून सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने सोन्याचे भाव वधारले आहेत.बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर जैसे थे ठेवल्याने अमेरिकन बाजारातील दबाव वाढल्याने डॉलर घसरला व भारतात अक्षय तृतीयेला सोन्याच्या खरेदीत व मागणीत वाढ झाल्याने अखेर सोने महागले आहे. सकाळपर्यंत घसरलेल्या युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत मोठी वाढ झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर १.८८ टक्क्यांनी वाढला आहे तर भारतातील एमसीएक्सवर सोन्याच्या निर्देशांकात तब्बल १.६८ टक्क्यांनी वाढ होत सोने ७२८४५.०० पातळीवर पोहोचले आहे.
 
भारतातील सराफा बाजारात सोन्यात मोठी वाढ झाल्याने भारतातील विविध शहरात सोन्यात मोठी वाढ झाली आहे. भारतात सरासरी २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८५० रुपयांनी वाढ झाली असून सोने ६७००० रुपयांवर पोहोचले आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम दरात ९३० रुपयांनी वाढ झाल्याचे सोने ७३०९० रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईत सोने प्रति १० ग्रॅम सोने ८५० ते ९३० रुपयांनी वाढले आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावामुळे क्रूड तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. अमेरिकन बाजारातील क्रूड तेलाच्या साठ्यात झालेली घसरण, मध्यपूर्वेतील गाझा पट्टीतील वाढलेला दबाव, तसेच चीधमधील क्रूड तेलाच्या मागणीत झालेली मोठी वाढ या कारणांमुळे बाजारात क्रूड महागले आहे. चीन हा सर्वाधिक कच्चे तेल आयात करणारा देश असल्याने बाजारातील क्रूड साठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
 
संध्याकाळपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील WTI Future क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८३ टक्क्यांनी वाढ झाली असून Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) तेलाच्या निर्देशांकात ०.९८ टक्क्यांनी वाढ होत प्रति बॅरेल किंमत ६६७१.०० रूपयावर पोहोचली आहे. एमसीएक्सवर नॅचरल गॅस निर्देशांकातही १.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेल किंमत ९२.१५ रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.
 
आज एकूणच बाजारातील वातावरणात 'बुलीश' फॅक्टर कायम दिसल्याने आगामी काळात गुंतवणूकदार पुन्हा आपल्या बाजारातील गुंतवणूकीत वाढ करु शकतात. गेले ४ ते ५ दिवस देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठी खरेदी विक्री केली असली तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात काढून घेतली होती.भारताच्या निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपला पुन्हा पूर्ण बहुमत मिळेल अथवा ना मिळेल यासाठी गुंतवणूकदारांचे लक्ष टिकून होते परिणामी गुंतवणूकदारांनी नवा ट्रिगर नसल्याने आखडता हात घेतला होता.
 
दुसरीकडे बँकांच्या प्रोव्हिजनींग कायद्याने बँकिंग क्षेत्रातील पडझड चालू असून बँकांनी या नवीन 'प्रोजेक्ट फायनान्स' तरतूदीतून सुट मिळावी यासाठी आरबीआयकडे तगादा लावला आहे. परंतु याचा परिणाम गुंतवणूकीत होताना दिसून आला ज्यामध्ये आजही बँक निर्देशांकात घट कायम राहिली आहे. बाजारात वाढ झाली असताना बँक निर्देशांकात घट झाल्याने रॅलीवर रोख लागली आहे.
 
बीएसईत लार्जकॅप समभागात आज ८ ते १६ टक्क्यांनी वाढ झाली असताना मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये १ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. घसरलेल्या समभागात ३ ते १४ टक्क्यांनी आज घसरण झाली होती.एनएसईत वधारलेल्या समभागात २ ते ४.५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून घसरलेल्या समभागात १ ते २ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती.
 
युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता जूनपर्यंत धुसर झाली असताना दुसरीकडे बँक ऑफ इंग्लंडने मात्र व्याजदरात कपात केली नाही. इंग्लंडमधील महागाई आटोक्यात असल्याने बँकेने हा निर्णय घेतला होता. दुसरीकडे जागतिक संकेत सुधारत असताना बाजारातील VIX Volatility या निर्देशांकात १.६९ टक्क्यांनी घसरण झाल्याने बाजारात स्थिरता प्राप्त झाली होती. गेले ४ दिवस VIX निर्देशांकात मोठी उसळत झाल्याने बाजारात मोठे चढ उतार झाले होते. काल बीएसईतील६९९४.८६ रुपये परदेशी गुंतवणूकदारांनी (FII) यांनी काढून घेतले होते तर एनएसईतून परदेशी गुंतवणूकदारांनी ६९९४.८६ कोटी रुपये काढून घेतले होते.
 
बाजारातील नफा बुकिंग पातळी सुरू असताना निवडणूक असल्याने बाजारातील तरलता (Liquidty) वाढवण्यासाठी आरबीआयने बाँड सरकारकडून पुन्हा विकत घेण्यासाठी ठरवले असल्याने आगामी काळात वित्तीय तरलता अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारातही मोठी वाढ झाली आहे.
 
अमेरिकन बाजारातील DoW Jones, S & P 50, NASDAQ या तिन्ही बाजारात वाढ झाली आहे तर विशेषत युरोपातील बाजारातील FTSE 100,CAC 100, DAX या तिन्ही बाजारात वाढ झाली असुन आशियाई बाजारातीलही तीनही NIKKEI, HANG SENG, SHANGHAI बाजारात वाढ झाली आहे. ब्लू चिप्स कंपन्यांच्या खासकरून रिलायन्स इंडस्ट्रीज,आयटीसी, भारती एअरटेल अशा समभागात वाढ झाल्याने त्याचा परिणाम निर्देशांकात दिसला आहे.
 
आता निवडणूकीचा तिसा टप्पा जवळ आलेला असताना बाजारातील गुंतवणूकदार काय पवित्रा घेतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गेले काही दिवस देशांतर्गत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक वाढल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी काढलेल्या गुंतवणूकीची झळ कमी पोहोचली होती. आता बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात कपात केल्याने तसेच युएसमधील बेरोजगारीचे आकडे पाहता भारतीय बाजारात काय हालचाल होते हे पाहणे पुढील वाटचालीसाठी आधारभूत ठरणार आहे. विशेषतः युएस महागाई दर यावर बाजारात प्रतिक्रिया उमटतील का भारत हा तिमाही निकालावर निर्भर राहत 'प्राईज करेक्शन' मध्ये पुन्हा गुंतवणूकदार प्राधान्य देतील यावर आगामी बाजारातील दिशा ठरेल.
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'मागील चार महिने FII ने केलेल्या विक्रीच्या मार सहन करूनही आपल्या बाजाराने नवीन नवीन उच्चांक दिले आहेत. आता अमेरीकन बाँड मार्केट व शेअर मधील तफावतीमुळे शेअर बाजारावर परिणाम दिसत आहे. बाँड स्वस्त झाल्यामुळे शेअर विक्री होत आहे. भारतात आता आलेली करेक्शन खूपच गरजेची होती. अजुनही एखाद दिवस करेक्शन येऊ शकेल. अमेरिकेत महागाई,जीडीपी जर व्यवस्थित होण्याकडे कल दिसला तर व्याजदर कपात शक्यतेचा विचार होईल.जूनच्या पहिल्या आठवड्यात आपली राजकीय परिस्थितीचे चित्र स्पष्ट होईल व अमेरिकेतील व्याज दराचेही'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना, जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,''भारतीय बाजार मोठ्या प्रमाणात सकारात्मक राहिले.तथापि,कमी मतदानामुळे गुंतवणूकदारांच्या मनात घरांतर्गत प्रीमियम मूल्यांकन आणि निवडणुकीची धाकधूक यामुळे विक्री वाढीचा ट्रेंड उदयास येत आहे. NIM आणि RBI च्या आकुंचनच्या लक्षणांमुळे आर्थिक स्थिती कमकुवत राहिली.दर कपात, चलनवाढीच्या चिंता, कॉर्पोरेट कमाईमध्ये संयम आणि प्रिमियम मूल्यांकन या व्यतिरिक्त, FII ची विक्रेते राहतील.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले,'देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक शुक्रवारी उच्च पातळीवर उघडले, मजबूत जागतिक संकेतांमुळे उत्साही. तथापि, निफ्टीने दिवसभर एका अरुंद श्रेणीत व्यवहार केला आणि २२०५५ वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, साप्ताहिक स्केलवर, निर्देशांकाने गेल्या आठवड्याच्या डोजी मेणबत्त्याला वेढले आहे, जे कमकुवतपणा दर्शवते.
 
तथापि, दैनंदिन चार्टवर, निर्देशांकाने एक आतील बार कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, जर निर्देशांकाने कालचा नीचांक २१९३२ ठेवला, तर त्याचा उपयोग नफा बुक करण्यासाठी केला जाऊ शकतो सुमारे २१७८० पातळी आणि १०० दिवसांचे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज (DEMA) २१८२० च्या जवळ ठेवले आहे, त्यामुळे २१७८० -२१८२० हे इंडेक्ससाठी पुढील प्रमुख समर्थन म्हणून काम करेल सरासरी (२१ DEMA) २२३३५च्या जवळ स्थित आहे, जे एक प्रमुख अडथळा म्हणून काम करेल.
 
बँक निफ्टी सकारात्मक नोटवर उघडला आणि ४७८६८ चा उच्चांक नोंदवला, परंतु विक्रीच्या तीव्र दबावामुळे दिवसाचा समारोप सपाट ते नकारात्मक ४७४२१ वर झाला. तांत्रिकदृष्ट्या साप्ताहिक स्केलवर गेल्या आठवड्यात निर्देशांकाने शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न तयार केला, जो त्यानंतर या आठवड्यात मंदीचे सावट होते, जे कमजोरी दर्शवते. जोपर्यंत निर्देशांक ४८००० च्या खाली राहील तोपर्यंत सतत कमजोरी कायम राहील. डाउनसाइडवर, निर्देशांकासाठी पुढील प्रमुख समर्थन ४७०५५ स्तरांजवळ ठेवलेले आहे, जेथे १०० दिवस एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज (DEMA) स्थित आहे. उलटपक्षी, बँक निफ्टी ४८००० च्या वर टिकून राहिल्यास, ४८३०० - ४८५०० पर्यंत रिलीफ रॅली शक्य आहे.'
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओचे सिनियर रिसर्च एनालिस्ट राजेश सिन्हा म्हणाले, 'आजच्या व्यापारात, मागील सत्रातील घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी उच्च पातळीवर बंद झाले कारण गुंतवणूकदारांनी खालच्या पातळीवर मूल्य खरेदीच्या संधी शोधल्या. बंद होताना सेन्सेक्स २६० अंकांनी वाढून ७२६६४ वर आणि निफ्टी ५०, ९७ अंकांनी वाढून २२०५५ वर होता. सुमारे २०३५ शेअर्स वाढले. १६१३ शेअर्समध्ये घट झाली आणि १३८ शेअर्स अपरिवर्तित राहिले.
 
विजया डायग्नोस्टिक सेंटरचे शेअर्स सुरुवातीच्या व्यापारात ७% पेक्षा जास्त वाढले आणि ७८५.३० रुपयांच्या नवीन शिखरावर पोहोचले कारण गुंतवणूकदारांनी FY24 च्या मार्च तिमाहीत कंपनीच्या स्थिर कामगिरीचा आनंद घेतला. नवीन बाजारपेठांमध्ये विस्तार करूनही कंपनीचे ऑपरेटिंग मार्जिन पातळी रोखून ठेवण्याच्या क्षमतेला ब्रोकरेजकडून थंब्स अप मिळाले.
 
कमकुवत मूलभूत तत्त्वे आणि भारताचा ठोस नफा असूनही चीनचे शेअर्स वाढल्यामुळे सिटीग्रुपने चीनला डाउनग्रेड केले, भारताला अपग्रेड केले. कमाईच्या वाढीमुळे, विशेषतः भारतातील उदयोन्मुख बाजारपेठेतील नफ्याचा त्यांना अंदाज आहे. हिंदुस्तान झिंकने विक्रमी उच्चांक गाठला, ७% पेक्षा जास्त वाढ करून, त्याचे बाजार भांडवल दोन लाख कोटींच्या पुढे ढकलले. कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत तिमाही नफ्यात ९% वाढ जाहीर केल्यानंतर हेस्टर बायोसायन्सेसचे समभाग ९% वाढले. नफा  ४.५३ कोटींवरून ४.९५ कोटींवर पोहोचला, महसूल १८% वाढून ७९.२६ कोटी झाला. '
 
मागणी वातावरण मध्यम आहे. कंपनीने तिमाहीत ३.६ % किमतीत कपात केली, डाउनट्रेडिंगमुळे मूल्य कमी होते. पेंट मार्केटमध्ये सध्या इकॉनॉमी सेगमेंटचा सर्वात मोठा वाटा आहे. कंपनी FY25 मध्ये १८ ते २० % किंवा अधिक EBITDA मार्जिन करेल. FY24 मध्ये स्वयंपाकघर आणि आंघोळीचे विभाग निराश झाले, FY25 मध्ये सुधारात्मक कारवाई केली. कंपनी किचन आणि बाथ विभागांमध्ये वाढीचा एक नवीन टप्पा पाहणार आहे. आज निफ्टी रियल्टी इंडेक्स सर्वाधिक १.४ % खाली घसरला, त्यानंतर निफ्टी आयटी १% घसरला. लाभधारकांमध्ये, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स अव्वल कामगिरी करणारा होता, १.१ % वर, त्यानंतर निफ्टी मेटल आणि FMCG, जे प्रत्येकी ०.९ % वाढले. निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्स आणि ऑइल अँड गॅस ०.६ % वाढले.'
 
बाजारातील एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, 'अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. यूएस नोकऱ्यांची कमकुवत आकडेवारी आणि डॉलरची घसरण यामुळे अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या किमती MCX मध्ये १००० पेक्षा जास्त वाढून ७२७०० वर पोहोचल्या. गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने ही वाढ आठवड्याभरात २७०० च्या वाढीनंतर झाली. डेटानुसार, पूर्वीच्या यूएस व्याजदर कपातीचा अंदाज घेऊन कॉमेक्स गोल्डला एका आठवड्यात २३७५ $ ची ७५$ वर २८$ पेक्षा जास्त वाढ झाली.'
 
बाजारातील रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,'महत्त्वपूर्ण घटना आणि किमान सट्टा क्रियाकलापांच्या अभावामुळे शांत ट्रेडिंग सत्रात रुपया ८३.५० च्या आसपास स्थिर राहिला.बाजारातील सहभागी आता रुपया-डॉलर जोडीवर कोणत्याही अल्पकालीन प्रभावासाठी यूएस चलनवाढ डेटाकडे पहात आहेत. रुपयाची श्रेणी ८३.३५ ते ८३.६५ च्या दरम्यान अरुंद असणे अपेक्षित आहे'.