शेअर बाजार विश्लेषण: बाजारात निम्न स्तरावर घसरण सेन्सेक्समध्ये ०.९४ टक्क्याने व निफ्टीत ६.९० अंशाने घसरण

बँक निफ्टीत वाढ कायम, सर्वाधिक वाढ पीएययु बँक समभागात

    03-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज थोडी घसरण आढळून आली आहे. शेअर बाजारात आज निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकात आज घसरण कायम राहिली आहे. जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेत चढ उतार येतच त्याचा मोठा फटका आशियाई बाजारात बसला आहे. पाच महिन्यातील सर्वाधिक वाढ क्रूड तेलाच्या भावात झाल्याने भारतातील एमसीएक्सवर क्रूड तेलाचे भाव प्रति बॅरेल ७१२२ रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजेच क्रूड तेलाच्या भावात ०.६४ टक्क्याने आज अखेरीस वाढ नोंदवली गेली आहे.
 
शेअर बाजारातील सेन्सेक्स निर्देशांक अखेरच्या सत्रात ०.९४ टक्क्याने घसरून ७३८७६.८२ पातळीवर पोहोचून बंद झाला आहे. निफ्टी ५० निर्देशांक अखेरीस ६.९० अंशाने बंद होत २२४४६.४० पातळीवर बंद झाला आहे. बीएससीत (BSE) सेन्सेक्स घसरला तरी सेन्सेक्स बँक निर्देशांकात आज ४०.०९ अंशाने वाढ झाली आहे. तर एस अँड पी लार्जकॅप मध्ये फारसे नुकसान झाले नसल्याचे दिसले आहे.
 
आज एकूण बाजारी भांडवलापैकी २५ टक्के वाटा लार्जकॅपचा राहिला आहे. तर बीएससी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.६१ टक्क्याने व १.१८ टक्क्याने वाढ झाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमधील वाढ कायम राहिली असली तरी आत परदेशी गुंतवणूकदारांनी १६२२ कोटींचे समभाग विकले असल्याने आज बाजारात मंदी जाणवली आहे. तर देशातील गुंतवणूकदारांनी १९५२ कोटी रुपये गुंतवणूक केल्याने आज घट मर्यादित स्वरूपात राहिली आहे.
 
आज निफ्टी बँक निर्देशांकातही वाढ झाली आहे. बँक निफ्टी ७८.८० अंशाने वाढल्याने बँक निफ्टी पातळी ४७६२४.२५ पातळीवर पोहोचला आहे. आज एनएससीवर (NSE) क्षेत्रीय निर्देशांकात देखील संमिश्र चढ उतार कायम राहिले आहेत. क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक फायदा पीएसयु बँक निर्देशांकात झाला असुन गुंतवणूकदारांना आर्थिक सर्वाधिक नुकसान रियल्टी समभागात झाले आहे.
 
भारतीय रूपया डॉलरच्या तुलनेत आज ८३.४९ रुपयांना बंद झाला आहे. आज रुपयांच्या तुलनेत डॉलर ५ ते ६ पैशाने वधारला आहे. आज बीएससीवर ३९६५ समभागांचे ट्रेडिंग (व्यापार) झाला असताना त्यातील २७९८ समभागांचे मूल्यांकन वाढले असून १०५४ समभागांचे मूल्यांकन आज घसरले आहे. १९४ समभागांचे दर आज अप्पर सर्किटवर पोहोचले आहेत तर १७ समभागांचे मूल्यांकन आज घसरून लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएससीत २७३५ समभागांपैकी १९२४ समभाग आज वधारले असून ७०५ समभागांचे आज मूल्यांकन घसरले आहे.३११ समभागांचे मूल्यांकन वाढल्याने हे समभाग अप्पर सर्किटवर पोहोचले तर २४ समभागांचे मूल्यांकन घसरल्याने त्यांचे मूल्यांकन आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत. १३२ समभागांचे दर ५२ आठवड्यातील सर्वाधिक ठरले असून १० कंपन्यांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे.
 
बीएससीमध्ये टीसीएस, भारती एअरटेल, एक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एचसीएलटेक, एम अँड एम, विप्रो, पॉवर ग्रीड, टाटा मोटर्स, एसबीआय, इन्फोसिस, एशियन पेटंस या समभागात वाढ झाली आहे. नेसले, कोटक महिंद्रा, जेएसडब्लू स्टील, टायटन कंपनी, इंडसइंड बँक, रिलायन्स, मारूती सुझुकी, एचयुएल, टाटा स्टील, लार्सन, आयसीआयसीआय, अल्ट्राटेक सिमेंट, सनफार्मा या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
एनएससीमध्ये श्रीराम फिनवेस्ट, एनटीपीसी, डिवीज, टीसीएस, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, एक्सिस बँक, ओएनजीसी, हिंदाल्को, एम अँड एम, कोल इंडिया, आयशर मोटर्स, टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड, एचसीएलटेक, एचडीएफसी बँक, ग्रासीम या समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. नेसले इंडिया, बजाज ऑटो, डॉ रेड्डीज, ब्रिटानिया, कोटक बँक, जेएसडब्लू स्टील, एचडीएफसी लाईफ, इंडसइंड बँक, सिप्ला, टायटन, हिंदुस्तान युनिलिव्हर, अपोलो हॉस्पिटल, मारूती, टाटा या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान झाले.
 
आज बाजारात का घसरण झाली ?
 
परदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात भागभांडवलाची विक्री
 
यु एस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात वाढ होईल ही अमेरिकन बाजारातील आशा
 
क्रूड तेलाच्या भावात वाढ
 
तैवानमधील भुकंप
 
युरोपीय बाजारातील मंदी
 
याशिवाय आज भारतीय हेक्साकॉम कंपनीचा आयपीओ बाजारात दाखल झाला आहे. वर्ल्ड बँकेने भारताचा विकासदर आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ७.५ टक्क्यांवर राहण्याची शक्यता नोंदवली आहे. याआधी अर्थतज्ज्ञांच्या मते भारतातील विकासदरात ७ ते ८ विकासदर राहण्याची शक्यता वर्तवली होती. भारतातील महागाई दर नियंत्रणात असून आरबीआयच्या वित्तीय धोरणातून रेपो दर जाहीर होण्याची वाट गुंतवणूक बघत असल्याने आज गुंतवणूकदारांनी सावधानतेचा इशारा बाळगला होता.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, ' आज निफ्टी २२४३४ वर बंद झाला, तर सेन्सेक्स ७३८७६ वर बंद झाला. निफ्टी पीएसयू बँक हे क्षेत्र होते ज्याने आज अनुक्रमे १.८७ % ने वाढ केली आहे. युक्रेनियन लोकांनी रशियन सुविधांवर केलेल्या हल्ल्यांनंतर आणि इराणचा थेट समावेश करण्यासाठी इस्रायल-हमास संघर्षाचा विस्तार होण्याची शक्यता, पेट्रोल आणि क्रूडच्या उपलब्धतेबद्दल गुंतवणूकदारांच्या भीतीमुळे तेलाच्या किमतीत आजच्या वाढीचा विस्तार झाला.
 
ब्लू पेबल हा पर्यावरणीय ब्रँडिंग सोल्यूशन्स आणि इंटीरियर डिझाइनचा प्रदाता आहे. ब्लू पेबल शेअर्स NSE SME मार्केटमध्ये १८.५ % च्या प्रीमियमवर सूचीबद्ध आहेत. १६८ च्या इश्यू किमतीच्या संदर्भात, स्टॉक १९९ रुपयांवर उघडला आणि २०८ रुपयांवर बंद झाला.५२ पेक्षा जास्त वेळा सदस्यता घेतलेल्या त्याच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला (IPO) जोरदार प्रतिसादाच्या तुलनेत, सूची किरकोळ कमी होती.
 
निफ्टीमध्ये श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, टीसीएस, ॲक्सिस बँक आणि टेक महिंद्रा हे प्रमुख लाभधारक होते, तर नेस्ले इंडिया, बजाज ऑटो, कोटक महिंद्रा बँक, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचा तोटा झाला.'
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी भाष्य करताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, ' बाजाराने आणखी एका सत्रासाठी अस्थिर व्यापार केला आणि मिश्र संकेतांचा मागोवा घेत एका सपाट नोटवर संपला. कमकुवत जागतिक बाजारपेठेने गॅप-डाउन सुरुवात केली परंतु निवडक हेवीवेट्समधील खरेदीमुळे काही वेळातच तोटा झाला. परिणामी, निफ्टीने कालच्या उच्चांकाचीही पुनरावृत्ती केली परंतु ती ओलांडण्यात अयशस्वी ठरली आणि अखेरीस तो २२४३४.६५ स्तरांवर बंद झाला.
 
दरम्यान, क्षेत्रीय निर्देशांकांनीही संमिश्र व्यवहार केले ज्यात आयटी आणि वित्तीय सेवा उच्च तर रिअल्टी आणि एफएमसीजी लाल रंगात बंद झाले. विशेष म्हणजे, व्यापक निर्देशांकांनी त्यांची उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली आणि ०.५ % -१.२% च्या श्रेणीत वाढ केली.
 
कमकुवत जागतिक संकेतांमध्ये निर्देशांकातील प्रचलित लवचिकता हे दर्शविते की वळू नियंत्रणात आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की निफ्टी २२५५० च्या पातळीपेक्षा अधिक मजबूत होईल. व्यापाऱ्यांनी स्टॉक निवडीवर लक्ष केंद्रित करून त्यानुसार त्यांची स्थिती संरेखित करावी.'
 
बँक निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले,"बँक निफ्टी निर्देशांकाने खालच्या पातळीवरून खरेदीचा दबाव अनुभवला आणि ४७५००-४७७०० च्या सपोर्ट झोनच्या वर टिकून राहण्यात यश मिळविले. तथापि, त्याला ४८००० वर तात्काळ प्रतिकाराचा सामना करावा लागला आणि निर्णायक यशामुळे ४९००० अंकाच्या दिशेने आणखी शॉर्ट-कव्हरिंग रॅली सुरू होऊ शकतात. RBI धोरण घोषणेपर्यंत ४७७००-४८००० च्या मर्यादेत एकत्रित होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर संभाव्य ट्रेंडिंग हालचाली अपेक्षित आहेत."