काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याला एमआयएमची ऑफर

    27-Apr-2024
Total Views | 83
 
Imtiaz Jaleel
 
मुंबई : एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्याला लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार न दिल्याने काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिला. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी त्यांना आपल्या पक्षाची ऑफर दिली.
 
 
 
इम्तियाज जलील यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत नसीम खान यांना सल्ला दिला. ते म्हणाले की, "केवळ स्टार प्रचारक पदाचा राजीनामा का? तुम्ही अशा पक्षाचा राजीनामा द्यावा ज्याला मुस्लिमांचे नेतृत्व नाही तर केवळ मुस्लिम मते हवी आहेत. आम्ही तुम्हाला मुंबईत एमआयएम पक्षाचे तिकीट द्यायला तयार आहोत. तुम्ही त्यावर निवडणूक लढवावी. ही एक चांगली संधी आहे. त्यामुळे थोडी हिंमत दाखवा आणि संधीचा फायदा घ्या," असा सल्ला इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना दिला आहे.
 
हे वाचलंत का? -  विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही, तर...; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा टोला
 
"काँग्रेसने सध्याच्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी एकाही जागेवर अल्पसंख्यांक समाजाचा उमेदवार दिला नसल्याने समाजात तीव्र नाराजी आहे. निवडणूकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मी अनेक ठिकाणी जाऊन पक्षाचा प्रचार केलेला आहे. परंतू, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यामध्ये मी स्टार प्रचारक आणि महाराष्ट्र प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे," अशी माहिती नसीम खान यांनी दिली.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
अभिजीतला

अभिजीतला 'अमोल' साथ; 'सुंदर मी होणार’ नाटकात अभिजीत चव्हाण आणि अमोल बावडेकर दिसणार महत्त्वपूर्ण भूमिकेत!

चौकट मोडून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करून पाहायला कलाकार कायमच उत्सुक असतात. आपल्या विनोदी शैलीने मालिका आणि चित्रपटात मजेशीर रंग भरणारे अभिनेते अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या सशक्त भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121