घरात पाणी मागायला आला इमाम अन् महिलेला एकटी पाहून केला बलात्कार

FIR दाखल! छत्तीसगडच्या सुरजपूरची घटना

    17-Apr-2024
Total Views |


Imam

(Image Credit - News 18 MP)

 
राँची : छत्तीसगडच्या सूरजपुर जिल्ह्यातील एका मशिदीतील इमामावर घरात घुसून बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. इमामचे नाव गुलाम गौस आहे. तो पाणी द्या सांगत घरात घुसला होता. पीडितेतर्फे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्याने तिच्या पतीची हत्या करण्याचीही धमकी दिली आहे. बुधवारी, दि. १० एप्रिल २०२४ रोजी ही घटना उघडकीस आली होती. मात्र, पीडितेने हिम्मत करत पाच दिवसांनी पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीसांत तक्रार दाखल झाल्यावर इमाम फरार झाला आहे. त्याचा शोध सध्या सुरू आहे.

याबद्दल मिळालेल्या वृत्तानुसार, ही घटना सुरजपुर जिल्ह्यातील क्षेत्र बसदेयी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. इथल्या गावात एक मशिद बनवली आहे. ज्यात इमाम गुलाम गौस स्थानिकांना नमाज पठण करवत होता. मशिदीच्या काही दूर अंतरावर २६ वर्षांच्या पीडितेचे घर आहे. इमाम आणि पीडितेचा पती एकमेकांना ओळखत होते. १० एप्रिल रोजी तो महिलेल्या घरी गेला. तेव्हा पीडिता एकटीच होती. गुलाम गौसने तिच्या पतीबद्दल विचारले आणि तो घरात घुसला. आधीच ओळख असल्याने तीनेही काहीच आक्षेप घेतला नाही. त्याने पीडितेकडे पाणी मागितले.

पाणी आणण्यासाठी पीडिता आत गेली. याचा फायदा घेत गुलाम गौस तिच्यावर जबरदस्ती केली. पीडितेने विरोध केल्यास तिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकीही दिली. .यानंतर त्याने तिच्याच घरी तिचा बलात्कार केला. त्यानंतर त्याने महिलेला धमकावत पळ काढला. काही दिवस पीडिता दुःख गिळून गप्प होती. मात्र, काही दिवसांनी तिची प्रकृती खालावली, पतीने याचं कारण विचारल्यानंतर तिच्या अश्रूंचा बांध फुटला.


प्रसंगाची माहिती मिळाल्यानंतर पीडितेच्या पतीने जवळच्या बसदेयी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी गुलाम गौस विरोधात एफआयआर दाखल केली आहे. यात IPC 376, 342, 458 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी इमामाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात प्रसिद्धी माध्यमांशी बोलता पोलीस ठाणे मुख्याधिकारी विमलेश दुबे यांनी आरोपीला लवकरच पकडण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.