ज्ञानवापी खटल्याशी अन्सारीचा संबंध!, 'मुस्लिम पक्षाला...'

    01-Apr-2024
Total Views | 83
mukhtar-ansari-used-to-give-donations-to-gyanvapi
 

 
नवी दिल्ली :     कुख्यात गुंड व माफिया मुख्तार अन्सारीचा बांदा येथील तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला होता. त्याच्या मृत्युनंतर अनेक नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, कुख्यात गुंड अन्सारीचा संबंध आता ज्ञानवापी प्रकरणाशी असल्याचे समोर आले आहे. दै. भास्करने एका भाजप नेत्याच्या हवाल्यानुसार अहवालात म्हटले की, मुख्तार अन्सारी ज्ञानवापीला देणगी देत ​​असे आणि त्या पैशातून खटले लढवले जात होते, असा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, माफिया मुख्तार अन्सारी हा २०१२ पासून ज्ञानवापी खटल्याकरिता पैसे देत असल्याचे समोर आले आहे. अन्सारीच्या मृत्युनंतर आता ज्ञानवापीचा खटला लढवण्यात फरक पडू शकतो, कारण निधीची कमतरता असू शकते, असा दावा करण्यात येत आहे. अन्सारी खटल्यातील महागड्या वकीलांची फीकरिता स्वतः पैसे द्यायचा. त्यामुळे आता अन्सारीच्या मृत्युनंतर ज्ञानवापी खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


ज्ञानवापी खटला वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिराशी संबंधित आहे. दरम्यान, या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायलयापासून ते उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात एकाच दिवशी होत असते. त्यामुळे आता यापुढील खटल्यासाठी वकीलांची फी कोण देणार, असा प्रश्न अन्सारीच्या मृत्युनंतर निर्माण झाला आहे. तसेच, भाजप नेत्याचा दावा आहे की, ज्ञानवापीचा खटला लढवण्यात फरक पडू शकतो, कारण निधीची कमतरता असू शकते.

सदर अहवालात दावा केला आहे की, २०२२ मध्येही ज्ञानवापी खटल्याकरिता केला जाणाऱ्या फंडिंगबाबत मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र नंतर ही मागणी शिथिल करण्यात आली. अँटी-माफिया फोरमचे अध्यक्ष आणि भाजप नेते सुधीर सिंह यांचा दावा आहे की, २०१२ मध्ये पहिल्यांदा मुख्तार अन्सारी याने ज्ञानवापीसाठी १० लाख रुपये दिले होते. मुख्तार अन्सारी उपचारासाठी बीएचयूमध्ये पोहोचले होते. येथे त्यांनी मुफ्ती अब्दुल बतीन यांची भेट घेतली. तसेच, या व्यवहारावेळी समाजवादी पक्षाचे नेतेदेखील उपस्थित होते, असा दावाही भाजप नेते सुधीर सिंह यांनी केला आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा तलावातील जलपर्णी काढण्‍याकामी तात्‍काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्‍यबळाचा वापर करावा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधिता संवर्धनासाठी मलजल वाहिन्‍या अन्‍यत्र वळविणे हाच कायमस्‍वरूपी तोडगा तलावातील जलपर्णी काढण्‍याकामी तात्‍काळ ५ संयंत्रे, अधिक मनुष्‍यबळाचा वापर करावा

पवई तलावाच्‍या पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्‍यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्‍या वनस्‍पती काढण्‍याची कार्यवाही वेगाने करण्‍यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्‍याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्‍यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून अटकाव करुन त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्‍या स्‍वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्‍प्‍यात आहे. पवई तलावाच्‍या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121