"संजय राऊत, माफी मागा अन्यथा..."; राहुल कनाल यांनी पाठवली नोटीस

    05-Feb-2024
Total Views | 67

Raut


मुंबई :
खिचडी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या आरोपांसंदर्भात युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या खोट्या आरोपांबाबत राऊतांनी माफी मागावी, अन्यथा उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करू, असा इशारा कनाल यांनी दिला आहे.
 
''खिचडी घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची ईडीने चौकशी केली. मात्र, ज्यांनी हा घोटाळा केला, ते सत्तेत सामील झाल्याने त्यांना संरक्षण मिळत आहे'', असा अरोप संजय राऊत यांनी केला होता. त्याला राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले होते.
 
''रेमडेसीवीर घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा किंवा खिचडी घोटाळा असो, यातील कुठल्याही घोटाळ्यात माझे किंवा अमेय घोले यांचे नाव आढळले, तर आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीचा राजीनामा देऊ. त्याचवेळी संजय राऊत यांनी वंदनीय बाळासाहेबांची शपथ घ्यावी की, जर आमचे नाव कुठल्याही घोटाळ्यात आढळले नाही, तर ते खासदारकीचा राजीनामा देतील'', असे खुले आव्हान कनाल यांनी दिले होते. याचप्रकरणी आता राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.

.

अग्रलेख
जरुर वाचा
जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला, की घेतला? - चर्चांना उधाण; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष, रोहित पवारांचे स्वप्न पुन्हा भंगले

स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाजला असताना, शरद पवारांनी अचानक प्रदेशाध्यक्ष बदलल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ७ वर्षे एकहाती पक्ष सांभाळणाऱ्या जयंत पाटलांनी अचानक राजीनामा द्यावा आणि तो शरद पवारांनी स्वीकारावा, इतक्यापुरती ही घटना मर्यादीत नाही. त्यामुळे हा राजीनामा खरोखरच स्वेच्छेने दिला गेला की पक्षातील गटबाजीमुळे त्यांना हटवण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दुसरीकडे, शशिकांत शिंदे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली असली, तरी रोहित पवार आणि समर्थकांत भलती नाराजी पसरल्या..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121