"माझं सरकार," या शब्दावर आक्षेप घेणाऱ्या भास्कर जाधवांना सुनावले खडेबोल

    19-Dec-2024
Total Views | 39
 
cm devendra fadnavis
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला भाषणातून थेट उत्तर दिले आहे. उबाठा आमदार भास्कर जाधव यांनी राज्यपालांच्या माझं सरकार या शब्दावर आक्षेप घेतला होता. त्यालाच प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जाधव यांना खडेबोल सुनावले.
 
"शाळेत असताना ते नागरिकशास्त्राला दांडी मारत असतील!"
 
"आमचे मित्र भास्कर जाधव याठिकाणी नाहीत. परवा त्यांना 'माझं सरकार' याच्यावरच आक्षेप होता. आता तसे ते फार हुशार आहेत. इतकी वर्षे त्यांनी राज्यपालांचे भाषण देखील ऐकलंल आहे. कदाचित शाळेत असताना ते नागरिकशास्त्राला दांडी मारत असतील. कारण शासन जे चालते ते मुख्यमंत्र्यांच्या नावाने चालत नाही, शासन राज्यापालांच्या नावाने चालतं आणि म्हणूनच ते माझं सरकार असतं, त्यामुळे राज्यपालांनी माझं सरकार म्हटलं आहे." असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121