विविध संघटनांच्या प्रतिनिधींचे रविंद्र चव्हाण यांना जाहीर समर्थन

    12-Nov-2024
Total Views | 30
Ravindra Chavan

डोंबिवली : “पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांसह सर्वच मोठे नेते हे देशाच्या विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. राष्ट्र पुढे नेण्यासाठी आपल्या सारख्यांचे हजारो हात गरजेचे असून सगळ्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. बुधवार, दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान करावे,” असे आवाहन मंत्री रविंद्र चव्हाण ( Ravindra chavan ) यांनी केले. त्यावर कर्तव्यनिष्ठ, कार्यतत्पर चव्हाण अशा शब्दात त्यांचा गौरव करून शहरातील बुद्धिवंतांनी त्यांचे समर्थन केले.

डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या ‘एकत्रीकरण’ उपक्रमात त्यांनी जाहीरपणे उपरोक्त भूमिका मांडली. त्यांना बिल्डर्स, डॉक्टर्स, आर्किटेक, सीए, पत्रकार, वकील, फार्मासिस्ट, शिक्षक यांसह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. जिमखान्याचे पर्णाद मोकाशी, सचिन चिटणीस यांनी या एकत्रिकरणाचे आयोजन केले होते. त्यावेळी डॉ. मिलींद शिरोडकर, आर्किटेक केशव चिकोडी, निवृत्त मेजर विनय देगावकर, बांधकाम व्यावसायिक माधव सिंग, ओंकार दाहोत्रे, राजन मराठे, राहुल दामले, विश्वदीप पवार, मंदार हळबे, नवरे, निलेश वाणी, समीर चिटणीस यांसह विविध क्षेत्रातील बुद्धिवंत उपस्थित होते.

जास्तीत जास्त मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून सगळ्यांनी आवर्जून सहकार्य करावे, असेही आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले. अडीच वर्षात अडीच हजारांहून अधिक निर्णय घेण्यात आले. त्याबाबत माहिती देण्यात आली. तर प्राची गडकरी यांनी सूत्रसंचालन केले.

अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121