'पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेड'च्या नफ्यात मोठी वाढ; राज्यात नवा प्लांट कार्यान्वित होणार!
31-Oct-2024
Total Views |
मुंबई : 'पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेड'च्या नफ्यात मोठी वाढ झाली असून सहामाहीत कंपनीने चांगली कामगिरी नोंदविली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पुदुमजी पेपर प्रोडक्ट्स लिमिटेडचा नफा ९९ टक्क्यांनी वाढला आहे. सहामाहीत करपूर्व नफ्यात मोठी वाढ नोंदवत कच्च्या मालाची किंमत आणि निव्वळ कमी झाल्यामुळे ७,७०३ कोटी रुपये इतके आहे.
दरम्यान, विक्री प्राप्ती आणि मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मितीसह एबिटामध्ये ७७ टक्के वाढ झाली आहे. तसेच, कंपनीच्या महसूलात वर्षागणिक १३ टक्के वृध्दी नोंदविली आहे. त्याचबरोबर, कंपनीने मागील सहामाहीच्या तुलनेत नियोजित भांडवलावर २७ टक्के परतावा मिळविला आहे. कंपनीच्या कामगिरीवर लक्ष टाकल्यास भारतीय भांडवली बाजारात एकूण मूल्य १,१४९ हजार कोटी आहे.
'पुदुमजी पेपर प्रॉडक्ट्स लिमिटेड' कंपनीने १५.४ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कंत्राटाकरिता प्रयत्नशील आहे. तसेच, पर्यावरण शाश्वततेच्या उद्दिष्टाला पाठिंबा देण्याच्या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र हरित ऊर्जेचा हिस्सा सध्याच्या गरजेच्या ४५% इतका आहे. विशेष म्हणजे कंपनीकडून पुढील आर्थिक वर्षात नवा प्लांट कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर, कंपनी विविध बायोडिग्रेडेबल आणि कंपोस्टेबल उत्पादनावर लक्ष केंद्रित करत असून स्पेशॅलिटी पेपर कंपनी टिकाऊ पॅकेजिंगसाठी इनपुट म्हणून वापरते. विविध अन्न उत्पादने, फार्मास्युटिकल आणि इतर उत्पादने, हॉस्पिटल पुरवठा, स्वच्छता क्षेत्रे, कन्फेक्शनरी याठिकाणी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.