कानपूर येथील रेल्वे ट्रॅकवर अग्निशामक यंत्र, लोको पायलटने वाचवले प्रवाशांचे प्राण
02-Oct-2024
Total Views |
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील देहाट जिल्ह्यात अंबियापूर नजीक येथून रेल्वे जात होती त्यावेळी लोको पायलटला दिल्ली-हावडा येथे डाऊनलाईनवर अग्निशामक यंत्र पडलेले दिसले. ही घटना २ ऑक्टोंबर रोजी २०२४ रोजी घडली होती. लोको पायलटने ट्रेन थांबवून नियंत्रण कक्षाला माहिती दिली. जीआरपी आणि आरपीएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे.
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांआधी कानपूर येथील रेल्वे ट्रॅकवर एक सिलिंडर सापडला होता. त्यावेळी हे लोको पायलटने रेल्वे संरक्षणाशी संपर्क करून त्यांनी संबंधित असलेला सिलिंडर काढण्यास सांगितला. त्यानंतर घटनास्थळी येऊन रेल्वे संरक्षण विभागाने तो सिलिंडर रेल्वेट्रॅकवरून काढून टाकला. याप्रकरणी अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
कानपुर देहात
➡रेलवे ट्रैक पर फिर मिला आग बुझाने वाला सिलेंडर ➡दिल्ली हावड़ा रूट के अम्बियापुर रेलवे ट्रैक पर मिला सिलेंडर ➡ट्रैक पर गुजर रही मालगाड़ी के सामने पड़ा मिला सिलेंडर ➡लोको पायलट ने इमरजेंसी ब्रेक लगाकर ट्रेन को रोका ➡लोको पायलट ने ट्रेन को रोककर अधिकारियों को दी… pic.twitter.com/3PJ9LQX75e
तर दुसरे प्रकरण हे झारखंडमधील साहिबगंज येथील आहे. मंगळवारी-बुधवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवून आणला. ही घटना बारहेत पोलीस ठाणे हद्दीतील रांगा गावाजवळील आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, शक्तिशाली स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकचा ४७० सेंटींमीटरचा तुकडा ३९ मीटर अंतरावर पडला आहे. याठिकाणी घटनास्थळी स्फोट झाला तेथे ३ फूट खोल खड्डा तयार तयार झाला.
यावेळी रेल्वेचे नाईटगार्ड जितेंद्र कुमारांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली आहे. ज्या रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले त्याचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. याप्रकरणात अज्ञातांचा हात असल्याची शक्यता आहे.