'घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेला राज्यभरातून प्रतिसाद!

    26-Sep-2023
Total Views | 93
Ecofriendly-Ganesha-Compition-By-MahaMTB
मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक बनवण्यासाठी 'दै. मुंबई तरुण भारत' तर्फे MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील अनेक गणेश भक्तांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून यास भरघोस प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेत गणेश भक्तांनी फक्त पर्यावरणपूरक गणपतीच बसवले नाहीत तर आपल्या पर्यावरणपूरक देखाव्यातूनही देशाभिमान जागृत केला आहे. नेरुळच्या कैलास महिपत धाडवे यांनी आपल्या गणपतीच्या देखाव्यातून भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेचे यश दाखवले आहे. त्यांचा हा देखावा पूर्णपणे पर्यावरणपूरकच आहे.
 
पुराणांनुसार गणरायाला आराध्य दैवत मानलं जातं. पण महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी गणरायाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज देखील आराध्य दैवत आहेत. त्यामुळेच यंदा जान्हवी ओम दांडेकर यांनी गणरायाभोवती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा देखावा तयार केला आहे. या देखाव्यासाठी त्यांनी जुने खोके, पत्रिका, कागद, वर्तमान पत्र यांचा वापर केला आहे.
जानेवारी २०२४ मध्ये राम नगरी अयोध्यात भव्य असे राम मंदिर उभं राहणार आहे. पण त्याआधीच नाशिकच्या गिरीश भालेराव यांनी गणरायाच्या देखाव्यातून राम मंदिर साकारले आहे. त्यांनी गणरायाची मुर्ती सुद्धा शाडूच्या मातीपासून बनवली आहे. अनेक गणेश भक्त गणरायाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. असाच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न अहमदनगरच्या आडेप परिवाराने केला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, गानकोकिळा लता मंगेशकर, मिताली राज, उद्योजक सुधा मूर्ती, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील महिलांच्या नारीशक्तीचा जागर देखाव्यात दाखवण्यात आला आहे.

दै. मुंबई तरुण भारत' तर्फे MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' या स्पर्धेत प्रथम पारितोषिक रुपये ५१ हजार रोख, द्वितीय पारितोषिक ३१ हजार रोख, तृतीय पारितोषिक २५ हजार रुपये रोख, असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची पद्धतही सरळ आणि सोप्पी आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आजही https://bit.ly/3RpZbSq या लिंकवर क्लिक करुन तुम्ही तुमची नोंदणी करु शकता. नोंदणीसाठी २८ सप्टेंबर ही अंतिम तारीख असेल. म्हणजेच तुमच्याकडे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे आपली नोंदणी आताच करा.

स्पर्धेची नियम व अटी :

१) उत्सवातील मूर्ती शाडू मातीची अथवा नैसर्गिक घटक वापरून तयार केलेली असावी

२) श्रींच्या मूर्तीवरील रंग नैसर्गिक असावेत.

३) उत्सवातील सजावट नैसर्गिक पाने फुले लाकूड कागद अथवा नैसर्गिक घटकांचा वापर करून तयार केलेली असावी
 
४)उत्सवात थर्माकोल आणि प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे.

५) उत्सवात विजेचा अतिरेकी वापर न करता विजेची बचत करावी.
 
६) सामाजिक संदेश, देखावा असणाऱ्या सजावटीला प्राधान्य
 
७) संपूर्ण उत्सवात सभोवतालच्या पर्यावरणाची आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.

८) पर्यावरणाचे रक्षण करत या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाच्या सजावटीचे ५ फोटो आणि आपण केलेली सजावट पर्यावरणपूरक कशी आहे, याबद्दलचे तपशील दिलेल्या लिंक वर आम्हाला पाठवा.



 

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121