नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ला केंद्र सरकारनेच घडविला असल्याची अफवा पसरविणाऱ्या अवि दांडिया नामक व्यक्तीस काँग्रेस पक्षाने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या समाजमाध्यम प्रमुखाची जबाबदारी सोपविली आहे.
अवि दांडिया नामक या व्यक्तीने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा एक बनावट व्हिडिओ शेअर केला होता. त्यांनी दावा केला होता की, व्हिडिओमध्ये तत्कालीन केंद्री गृहमंत्री राजनाथ सिंह, तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि एका अज्ञात महिलेमधील संभाषण आहे. व्हिडीओमध्ये हे तिघे पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या कटावर चर्चा करत होते. त्याद्वारे हा हल्ला केंद्र सरकारनेच घडविल्याची अफवा पसरविण्यात आली होती.
मात्र, हा व्हिडिओ छेडछाड करून तयार करण्यात आला असल्याचे सिद्ध झाले होते. संबंधित नेत्यांच्या जुन्या मुलाखती आणि ऑडिओ क्लिपचे काही भाग घेऊन तो तयार करण्यात आला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी मार्च २०१९ मध्ये अवी दांडियाविरुद्ध आयपीसी कलम ४६५ आणि ४६९ अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.
ईको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करा, जिंका ५१ हजारांचे बक्षीस!
दैनिक 'मुंबई तरुण भारत' आयोजित MPCB प्रस्तुत 'MahaMTB घरगुती ecofriendly गणेशा' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवरील गुगल फॉर्म नक्की भरा!
https://bit.ly/3RpZbSq