काँग्रेसने भारताच्या नकाशातून ईशान्य भारताला वगळलं; ट्विटरवर प्रकाशित केला चुकीचा नकाशा

    17-Sep-2023
Total Views |
congress map 
 
मुंबई : काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बनवलेल्या व्हीडिओमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. काँग्रेसने आपल्या व्हीडिओत दाखवलेल्या नकाशामध्ये ईशान्य भारताचा भाग दाखवला नाही. काँग्रेसच्या या कृत्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी टीका केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "तुम्ही केवळ पंतप्रधानांच्या विरोधात नाही तर ईशान्य भारताविरुद्धही तुमचे विचार दाखवले आहेत."
 
काँग्रेसने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील अधिकृत हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जारी केलेल्या व्हिडिओमध्ये भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे, ज्यामध्ये संपूर्ण ईशान्य भारत गायब आहे. काँग्रेसच्या पोस्टवर टीका करताना सरमा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याच्या नादात काँग्रेसने ईशान्येकडील आणि तेथील लोकांप्रती आपली उदासीनता दाखवून दिली आहे.
 
हिमंता बिस्वा पुढे बोलताना म्हणाले की, "काँग्रेस पक्षाने ईशान्य भाग शेजारील देशाला विकण्याचा करार केल्याचे व्हीडिओवरून दिसते. त्यामुळेच राहुल परदेशात गेले आहेत आणि दहशतावादी कायद्याखाली अटकेत असलेल्या शरजील इमामला पक्षाने सदस्यत्व दिले आहे?
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.