मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील स्त्रीरोग तज्ज्ञ या पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरतीप्रक्रिया राबवली जाणार आहे. याकरिता ठाणे महानगरपालिकेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या थेट मुलाखतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अंतिम मुदत दि. २२ सप्टेंबर असणार आहे.
ठाणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील “आरोग्य सखी” योजने अंतर्गत मॅमोग्राफी व्हॅनवर “स्त्री रोग तज्ज्ञ” पदांच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी – ४० वर्षे तर मागास प्रवर्गासाठी – ४५ वर्षे.
मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे.
तसेच, भरतीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.