अटारी बॉर्डरवर फडकणार सर्वात उंच तिरंगा!

    14-Sep-2023
Total Views |
Largest Flag Inaugurated On India's Tallest Post At Attari Border

नवी दिल्ली
: पंजाबमधील अमृतसर येथील अटारी बॉर्डरवर देशातील सर्वात उंच तिरंगा फडकणार आहे. भारताच्या सुर्वण मंदिराच्या समोर ४१८ फूट उंच राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी पुर्ण तयारी करण्यात आली आहे. दरम्यान भारताने अटारी सीमेवर बसवलेल्या तिरंग्याच्या खांबाची उंची शेजारी देश पाकिस्तानपेक्षा १८ फुटांनी वाढवली आहे. आधी भारतीय तिरंग्याच्या खांबाची उंची ३६० होती, तर पाकिस्तानच्या ध्वजाच्या खांबाची उंची ४०० फूट ठेवण्यात आली आहे.

मात्र आता सुर्वण मंदिराच्या समोर ४१८ फूट उंच ध्वजस्तंभ तयार असून उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे उद्घाटन काही दिवसांत होणार होते, मात्र काही कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. मात्र लवकरच या ४१८ फूट उंच ध्वज खांबावर भारतीय तिरंगा फडकताना दिसणार आहे.

३.५ कोटी रुपये खर्च

हा ध्वज खांब भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ३.५ कोटी रुपयांना बसवला आहे. ३६० फूट उंचीच्या जुन्या ध्वज खांबापासून १०० मीटर अंतरावर गोल्डन गेटसमोर हा ध्वज खांब बसवण्यात आला आहे. जमिनीपासून ४ फूट उंचीचा पाया तयार करण्यात आला असून, त्यावर हा ध्वज खांब उभारण्यात आला आहे. त्याच वेळी, जुना ध्वज खांब अमृतसर सुधार ट्रस्टने २०१७ मध्ये बांधला होता.
 
आतापर्यंत देशाचा सर्वोच्च ध्वज बेळगाव, कर्नाटकात फडकत आहे. ज्यांची उंची ११० मीटर म्हणजेच ३६०.८ फूट आहे, जी अटारी सीमेवर आतापर्यंत फडकवलेल्या तिरंग्यापेक्षा फक्त ८ फूट जास्त आहे. मात्र नवीन ध्वज खांबाच्या उद्घाटनानंतर अटारी सीमेवर सर्वात उंच तिरंगा फडकवण्यात येणार आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.