ग्लूटेन-फ्री आहार म्हणजे काय?

    13-Sep-2023
Total Views | 161
 
Gluten-free diet
 
 
मुंबई : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. फिटनेससाठी योग्य आहार आवश्यक असतो. संतुलित आहार हा आरोग्याचा मूळ मंत्र मानला जातो. सोशल मीडियाच्या या युगात आपल्याला अनेक नवनवीन गोष्टींची माहिती मिळते. कधी न एकलेले डाईटचे प्रकार ही आपल्या कानावर पडतात. वजन कमी करणे आणि पचनसंस्थांचे कार्य सुधारण्यासाठी लो- फॅट डाईट फॉलो केले जाते. तसेच, ग्लूटेन-फ्री डाईट चे नाव तुम्ही एकले आहे का? अनेक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सही या आहाराचे फायदे सांगत असतात आणि लोकांना हा आहार घेण्यास प्रेरित करत असतात. यामुळेच आजकाल बरेच लोक ग्लूटेन-फ्री आहाराकडे वळत आहेत. पण, ग्लूटेन-फ्री आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
 
ग्लूटेन मुक्त आहार कधी घ्यावा? कोणाला हा आहार आवश्यक आहे आणि त्यांनी हा आहार का घ्यावा? हे समजून घेणे आवश्यक आहे. ग्लूटेन-मुक्त आहार म्हणजे आपल्या आहारात ग्लूटेन नावाचे प्रथिन असलेले काहीही न घेणे. हे सामान्यतः गहू, रवा, आणि अनेक तृणधान्यांमध्ये आढळते. सिलिआक सारख्या काही आजार असलेल्या रूग्णांसाठी ग्लूटेन हानिकारक आहे कारण त्यांच्यात ग्लूटेनप्रती ऑटोइम्युन रिस्पॉन्स असतो ज्यामुळे लहान आतड्याचे नुकसान होते. यामुळे ओटीपोटात दुखणे, गॅस, अपचन आणि जुलाब देखील होऊ शकतात.
 
जर तुम्ही फक्त वजन कमी करण्यासाठी ग्लूटेन फ्री डाएट फॉलो करत असाल तर त्यामुळे तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. ग्लूटेनमध्ये फायबर नसतो, ज्याच्या कमतरतेमुळे तुमचे पचन बिघडू शकते आणि वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकते. ग्लूटेन-मुक्त आहारामध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. परंतु तरीही त्यात पोषक घटक नसतात. या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हानी होऊ शकते.जसे की लोह आणि फॉलिक ऍसिडची कमतरता, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121