‘लव्ह आणि ड्रग्ज जिहाद’चा धोका ओळखा

सामाजिक कार्यकर्त्या योगिता साळवी यांचे विद्यार्थिनींना आवाहन

    12-Sep-2023
Total Views |

yogita salvi

 
नवी मुंबई : “सध्या समाज ‘लव्ह जिहाद’ आणि ’ड्रग्ज जिहाद’च्या विळख्यात अडकत चालला आहे. त्यामुळे हा धोका ओळखून मुलींनी सावध राहायला हवे,” असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या आणि दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी केले. ऐरोली, नवी मुंबई येथील ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था संचलित ऐरोली माध्यमिक विद्यालयात सोमवार दि. 11सप्टेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ आयोजित ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ या अभियानाअंतर्गत ’संवाद आपल्या कन्यांशी’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी शाळेतील शेकडो विद्यार्थिनींशी संवाद साधला.

योगिता साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ’ड्रग्ज जिहाद’मध्ये मुलींच्या फसण्याच्या अनेक बाबींचा उहापोह केला. “लव्ह जिहादमध्ये फसण्याचे कारण काय? तर जीवनामध्ये धर्म संस्कार आणि संस्कृतीचा अभाव. कुटुंब ही एक शक्ती आहे, माता पिता हे मुलावर निःस्वार्थी प्रेम करतात. त्यांच्या प्रेमाची, विश्वासाची जाणीव पाल्यांनी ठेवायला हवी. तरच पाल्य, मुली, विद्यार्थिनी आयुष्यात प्रगती करत उज्ज्वल भवितव्य घडवू शकतात,” असे वक्तव्य साळवी यांनी केले. त्यांनी ’लव्ह जिहाद’, ’ड्रग्ज जिहाद’ म्हणजे काय? त्याची कारणे, त्याचा व्यक्ती, कुटुंब आणि समाज तसेच देशावर होणारा दुष्परिणाम याची विस्तृत माहिती देताना मुलींना सजग राहण्याचे आवाहन केले.


school girls

योगिता साळवी यांनी आपल्या व्याख्यानात 'लव्ह जिहाद'च्या सत्य घटना सांगितल्या. उज्ज्वल भवितव्यासाठी मुलींनी सावध राहायला हवे, संस्कार, संस्कृती जपली पाहिजे. कायदा तुमच्यासोबत आहे, समाज तुमच्यासोबत आहे," असे त्या म्हणाल्या. आम्ही कुटुंब, समाज आणि देशाच्या भवितव्यासाठी उज्ज्वल स्वप्ने पाहू. 'लव्ह जिहाद'च्या जाळ्यात फसणार नाही, धर्म संस्कार मूल्य जपत उज्ज्वल भविष्य घडवू, अशी ग्वाही यावेळी शेकडो विद्यार्थिनींनी दिली.

यावेळी ज्ञानदीप विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या ठाकूर, चार्टर्ड इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती रुळे, चार्टर्ड इंग्लिश स्कूल प्राथमिकच्या मुख्याध्यापिका स्मिता संकपाळ, संस्थेचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, ऐरोली माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा गोसावी आदी उपस्थित होत्या.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.