Authored Article : या स्वातंत्र्यदिनी, चला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे 12 प्रमुख उपाय बघूया

    12-Sep-2023
Total Views |
Indiafirst
 
 
 
या स्वातंत्र्यदिनी,चला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे 12 प्रमुख उपाय बघूया
 
 
आपल्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक सदिच्छा!! देश जसजसा मजबूत होत आहे तसतसे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची महत्ता कळत आहे. स्वातंत्र्यावर विचार करताना, चला आपण पण स्वतंत्र असण्याची - आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असण्याची शपथ घेऊ या. हे असे स्वातंत्र्य आहे ज्यामुळे आपल्याला मनःशांती आणि आपल्या बकेट लिस्टमध्ये असलेल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचे देखील स्वातंत्र्य मिळते. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी तुमच्याकडे नोकरी/उत्पन्नाचा स्त्रोत असणे आवश्यक आहे. एकदा का उत्पन्न स्थिर झाले की ती व्यक्ती आर्थिकदृष्ट्या लवकरात लवकर स्वतंत्र होईल याची खात्री करण्यासाठी खालील गोष्टी केल्या पाहिजेत.
 
 
1.कृपया तुमच्या उत्पन्नातील काही टक्के बचत करा. तुमच्या स्वातंत्र्याच्या प्रवासाचा हा सर्वात महत्त्वाचा बिंदू आहे.
 
 
2. ही बचत नंतर यूलिप्स, म्युच्युअल फंड्स आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये वळवली पाहिजे. बचतीचे पैसे इक्विटी फंडांमध्ये अधिक टाकले पाहिजे. व्यक्ती जितकी लहान असेल तितके इक्विटीमध्ये पैसे अधिक टाकावे कारण ठेवा जरी अल्पावधीत अस्थिर असला तरी तो दीर्घकाळात उच्च परतावा देतो (महागाईवर मात करत परतावा देतो).
 
 
3. लहान वयातच गृहनिर्माण कर्ज घेणे योग्य आहे. कारण बोनस किंवा कोणतेही अतिरिक्त पैसे मिळाल्यावर ते प्रीपेड केले जाऊ शकते. म्हणजे तुम्ही कर्जापासून, विशेषत: गृहनिर्माण कर्जापासून मुक्त असाल.वयाच्या पन्नाशीनंतर अंगावर कोणतेही कर्ज नसावे- जेणेकरून कामाच्या शेवटच्या वर्षांपर्यंत दायित्वांचा भार पडू नये.
 
 
4. मुदत विमा घ्यावा, म्हणजे एखादी दुर्दैवी घटना घडल्यास कुटुंबाचे संरक्षण होईल आणि तुम्हाला त्या बाबतीत चिंता करण्याची गरज नसेल.
 
 
5. आपण मागील 3 वर्षात विशेषत: कोविड दरम्यान पाहिले की आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे किती गरजेचे आहे. आजारी पडल्यावर रुग्णालयात दाखल केल्याने बचतीचा लक्षणीय भाग खर्च होऊ शकतो. त्यामुळे स्वत:साठी आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा घेणे आवश्यक आहे. यामुळे आरोग्य वित्तविषयक समस्यांपासून मुक्त असण्यास मदत होईल.
 
 
6. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी जसे आपत्कालीन प्रवास किंवा मुलांसाठी काही अतिरिक्त खर्च, यासाठी एक छोटासा आपत्कालीन निधी बँकेत ठेव म्हणून असू देणे आवश्यक आहे.
 
 
7. ध्येयाभिमुख गुंतवणूक ही आर्थिक चिंता कमी करण्यास मदत करते. त्यासाठी म्युच्युअल फंड्स/यूलिप्समध्ये गुंतवणूक करावी. तुम्हाला प्रवास करायचा असेल किंवा मुलांचा वाढदिवस किंवा पालकांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा असल्यास पद्धतशीर गुंतवणूक योजनांद्वारे असे करणे शक्य होऊ शकेल.
 
 
8. विमा कंपन्या दीर्घकालीन गॅरंटीड बचत योजना देखील ऑफर करतात. जीवनात अधिक निश्चिंतता आणण्यासाठी त्या घेतल्या जाऊ शकतात. निवृत्तीनंतर मिळणार्‍या पैशातून मिळणाऱ्या रकमेवर वार्षिकी (अॅन्युइटी) देखील घेता येतात. वार्षिकी किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे केव्हाही चांगले आहे. त्यामुळे पैसे वाया जाणार नाहीत.
 
 
9. तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास आरबीआयने जारी केलेले सार्वभौम गोल्ड बॉन्ड्स आहेत. ते एक्सचेंजेसवर देखील व्यवहार केले जातात. ते सोन्याच्या किमतीशी निगडीत असल्यामुळे त्यांनी भूतकाळात खूप चांगला परतावा दिला आहे. आरबीआयदेखील 2.5% चे कूपन देते आणि ते मुदतपूर्तीपर्यंत ठेवल्यास त्यावर कोणताही मुद्दल नफा कर नाही! यामुळे ही गुंतवणुकीची अतिशय आकर्षक संधी आहे.
 
.
10.आपण फालतू खर्च, विशेषत: सोशल मीडियाच्या मोहात पडून वायफळ खर्च न करण्याचे देखील सुनिश्चित केले पाहिजे. हा खर्च उत्पन्नाचा फारच लहान भाग असावा, जेणेकरून वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डचा बोजा पडणार नाही.
 
 
11. तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी वेळेवर भरावी – जेणेकरून तुम्हाला दंड किंवा व्याज भरावा लागणार नाही. यामुळे स्वतःमध्ये शिस्त निर्माण होण्यास मदत होते आणि स्वतःला नियंत्रणात ठेवता येते.
 
 
12. मुलांना पैशाचे मूल्य शिकवावे जे त्यांना आणि तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करेल.
 
 
आशा आहे की तुम्ही वर नमूद केलेल्या टिप्स लक्षात घेऊन आणि चक्रवाढीची ताकद लक्षात ठेऊन विवेकपूर्ण गुंतवणूक केल्यास आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळवू शकाल. अशा प्रयत्नासाठी तुम्हाला खूप-खूप सदिच्छा!!
 
 
(लेखिका पूनम टंडन इंडियाफर्स्ट लाईफ इन्शुरन्स चीफ इनव्हेसमेंट ऑफिसर आहेत.)
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.