मुंबई : रत्नागिरी उपविभागातंर्गत पोलीस पाटील पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. रत्नागिरी उपविभागाद्वारे पोलीस पाटील भरती २०२३ जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी याकरिता अर्ज करावयाचा आहे. दंडाधिकारी रत्नागिरी उपविभाग, येथून प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेत १०२ रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलीस पाटील भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत २० सप्टेंबर २०२३ असणार आहे. पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी नोकरीची ठिकाण रत्नागिरी उपविभाग असणार आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. उमेदवाराचे वय २५ ते ४५ वर्षे असणे बंधनकारक आहे. तसेच, अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करायचे असून भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.