मदरशात मौलानाचे पाप ; मौलाना आणि त्याच्या पुतण्याने ८ वर्षाच्या मुलासोबत केले दुष्कृत्य!

    19-Jul-2023
Total Views | 125
Maulana was misbehaving with an 8-year-old child for two months

लखनऊ
: धार्मिक प्रशिक्षणासाठी आलेल्या आठ वर्षांच्या मुलाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी मदरशाच्या मौलाना आणि त्याच्या पुतण्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरची आहे. ४० वर्षीय मौलाना अफजल आणि त्याचा भाचा सलमान अशी आरोपींची नावे आहेत. हा पीडित विद्यार्थी असलेल्या मदरशाचा मौलाना अफझल हाफिज देखील आहे.
 
दोन महिन्यांपासून या पीडित मुलासोबत कुकृत्य करण्यात आले होते. १७ जुलै रोजी पोलिसांनी आरोपींना अटक करून तुरूंगात रवानगी केली. बुलंदशहरच्या जहांगीराबाद पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या मदरशातील पीडित विद्यार्थी १६ जुलै रोजी स्वतः पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला होता. त्याने आपल्यासोबत झालेल्या त्रासाची माहिती पोलिसांना दिली. आरोपी बुलंदशहरच्या दिबई पोलीस स्टेशन हद्दीतील दानपूर गावचे रहिवासी आहेत.

पीडित विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, १५ जुलै रोजी हाफिज आणि त्याच्या नातेवाईकाने दुष्कृत्य केले. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी मुलाची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते. दोघांना १७ जुलै रोजी पक़डण्यात आले.

मदरशाशी संबंधित काही लोक या घटनेला संशयास्पद म्हणत आहेत. एका स्थानिक यूट्यूब चॅनलशी बोलताना मुफ्ती खालिद यांनी दावा केला की, पीडितेच्या मेडिकलमध्ये काही खास माहिती नाही. खालिदच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत कोर्टात आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणालाही दोषी ठरवता येत नाही. दुसरीकडे, मदरशातील वृद्ध हाजी इलियास यांनी पीडित विद्यार्थ्याचे आरोप खोटे असल्याचे सांगितले. हाजीच्या म्हणण्यानुसार, मुलाने यापूर्वीही अनेकदा असे आरोप केले आहेत. तो मदरशातूनही पळून गेला आहे. हाजी इलियासनेही पीडित विद्यार्थ्याला मानसिकदृष्ट्या कमकुवत ठरवण्याचा प्रयत्न केला.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121