प्रतापगड प्रधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे भोसले यांची मुख्यमंत्र्यांकडुन नियुक्ती!

    02-Jun-2023
Total Views | 159
 
Eknath Shinde
 
 
मुंबई : शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी निधी देणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. तसेच, प्रताप गड प्राधिककरण जाहिर करण्यात आलं आहे. तर या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं यंदाचे ३५० वे वर्ष आहे. किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
 
लंडनमधली भवानी तलवार आणि वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामध्ये आपल्याला मदत करणार आहेत. असही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121