‘मोबाईल जिहाद’च्या म्होरक्याला बेड्या

धर्मांतर करणारा मुंब्य्रातील शाहनवाज खानला केले जेरबंद

    12-Jun-2023
Total Views | 62
Thane Mobile Jihad Case

ठाणे
: ऑनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून हिंदू तरुणांचे धर्मांतर करून ‘मोबाईल जिहाद’ पुकारणारा मुंब्रा येथील मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला रविवारी ठाणे पोलिसांनी अलिबाग येथून जेरबंद केले आहे. त्याला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मोबाईल गेम खेळण्याच्या बहाण्याने ४०० मुलांचे धर्मांतर करण्याच्या प्रकरणाचे धागेदोरे मुंब्र्यात आढळले होते. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश राज्यातील गाझीयाबाद पोलिसांचे पथक मुंब्य्रात ठिकठिकाणी छापे मारून धर्मांतर कांडातील शाहनवाज खान या आरोपीचा शोध घेत होते.

शाहनवाज खान राहत असलेले मुंब्र्यातील देवरी पाडा येथील शाजिया बिल्डिंगमधील घरावर पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. ठाणे पोलीस उपायुक्त कार्यालयात शाहनवाज यांच्या आईलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.तसेच, या धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी शाहानवाजचे बँक खाते गोठवले होते. अखेर, मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे पोलिसांनी अलिबाग येथील एका हॉटेलात छापा मारून शाहानवाज खान याच्या मुसक्या आवळल्या.

‘मोबाईल जिहाद’ची खेळी

शाहनवाज याच्या चौकशीत, त्याची व पीडित मुलाची ओळख २०२१ च्या सुरुवातीस फोर्ट नाईट या गेमिंग अ‍ॅप्लिकेशनवरून झाली. गेम खेळताना एकमेकांशी बोलण्यासाठीच्या सुविधेमार्फत ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन त्यांनी एकमेकांचे मोबाईल जिहाद’च्या म्होरक्याला बेड्या फोन नंबर घेऊन बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी हा गेम खेळणे बंद केले. डिसेंबर २०२१ अखेर ‘वालोरंट’ हा नवा गेम खेळण्यास सुरुवात केली. हा गेम खेळत असताना ‘आईस बॉक्स’ या टार्गेटच्या ठिकाणी पोहोचले असता दोघांमध्ये पहिल्यांदा धर्मांतर विषयावर बोलणे झाले व झाकीर नाईक यानी केलेल्या स्पीचवर चर्चा झाली. शाहनवाझ हा त्याच्या राहत्या घरी असलेल्या कम्प्युटर वरून गेम खेळत होता त्याच्याजवळ एक ‘वन प्लस’ मोबाईल, एक आयपॅड व कॉम्पुटर आहे. आरोपीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर असून त्याच नावाने इंस्टाग्राम अकाऊंटदेखील आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

असा काढला माग

मोबाईल जिहाद पुकारून धर्मांतर करणारा बद्दो उर्फ शाहनवाज मकसुद खान या २३ वर्षीय आरोपीचा शोध घेण्यासाठी गाझियाबाद पोलिसानी जंग जंग पछाडले. पण तो हाती लागला नव्हता. अखेर मुंब्रा पोलीस ठाण्याचे स. पो. निरीक्षक कुंभार व त्यांच्या पथकाने शाहनवाज व त्याच्या नातेवाईकांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले. तेव्हा, शाहनवाज वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचा सुगावा लागल्याने वरळी पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध घेतला. परंतु, शाहनवाज आलिबागला पळाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लागलीच मुंब्रा पोलीस पथक परस्पर अलिबाग येथे रवाना होऊन तेथील एका लॉज कॉटेजमधून रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळल्या.


अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121