केरळ: अलप्पुझा-कन्नूर एक्स्प्रेस ट्रेनला आग, जाळपोळ झाल्याचा संशय!
01-Jun-2023
Total Views | 359
तिरुवनंतपुरम : अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसला कन्नूर रेल्वे स्थानकावर दि. ३१ मे रोजी रात्री भीषण आग लागली.अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. त्याचवेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही दि. २ एप्रिल रोजी एका व्यक्तीने या ट्रेनला आग लावली होती, त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान यावेळी कन्नूर-अलाप्पुझा एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेस (१६३०६) कन्नूर रेल्वे स्थानकावर थांबलेल्या अज्ञात व्यक्तीचा सध्या पोलिसांनी शोध सुरू केला आहे. ही घटना घडली तेव्हा ट्रेनमधील प्रवासी खाली उतरले होते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्स्प्रेसला कन्नूर रेल्वे स्थानकावर रात्री ११ वाजता पोहचली. त्यावेळी आग लागल्याचे प्रथम रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. मात्र त्यावेळी अग्निशमन दलाची गाडी न पोहचल्याने प्रवाश्यांमध्ये घबराट पसरली होती. पण तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
आगीत एक बोगी पूर्णपणे जळून खाक झाली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ट्रेनला आग लावली असावी असा रेल्वे अधिकाऱ्यांचा संशय आहे. ट्रेनच्या मागील बाजूच्या तिसऱ्या बोगीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.