पुण्यात पाच कोटींचे मेटाॲंफिटामाईन अमली पदार्थ जप्त
पुणे कस्टम्सची खेड शिवापूर टोल नाक्यावर कारवाई : आरोपींचा केला पाठलाग
31-May-2023
Total Views | 47
पुणे : पुण्यामधील अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना मागील काही दिवसात वाढल्या आहेत. पुणे कस्टम्स विभागाने खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर तब्बल पाच कोटी रुपयांचा मेटाॲंफिटामाईन अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. हे मेथामाफेटामाईन सातार्यावरुन मुंबईला नेले जात होते. कस्टम्सच्या अधिकार्यांनी सातारा ते लोणावळा असा पाठलाग करुन चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे कस्टम्स विभागाच्या अधिकार्यांना या तस्करीबाबत माहिती मिळाली होती. आरोपी सातार्यावरुन मुंबईला मोठ्या प्रमाणावर मेटाॲंफिटामाईन पोचविण्यासाठी निघाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कस्टम्सच्या अधिकार्यांनी सातार्यावरुन आरोपींच्या मोटारीचा पाठलाग सुरु केला. खेड शिवापूर टोल नाक्यावर आरोपींची गाडी अडविण्यात आली. कस्टम्सच्या पथकाने तात्काळ दोन आरोपींना ताब्यात घेत ८५० ग्रॅम मेथामाफेटामाईन जप्त केला. दरम्यान, आरोपींचे आणखी दोन साथीदार लोणावळ्यात भेटणार असून त्यांच्याकडेही अमली पदार्थ असल्याची माहिती तपासात समोर आली.
परंतु त्यांचे आणखी दोन साथीदार लोणावळ्यात त्यांना भेटणार असून कस्टम्सच्या पथकाने लोणावळ्यात छापा टाकत आणखी दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडूनही २०० ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.