शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
31-May-2023
Total Views | 53
महाराष्ट्र : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यावर्षी २ जून रोजी ३५०वे वर्ष आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात अनेक वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. संपूर्ण राज्यातून शिवप्रेमी रायगड किल्ल्यावर जाणार आहेत. यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, दि. ३१ मे मध्यरात्री १२ वाजल्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिवप्रेमींना किल्ल्यावर जाण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्या ठिकाणी पोलीस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, नियमानुसार, १ आणि २ जून तसेच 5 आणि 6 जून रोजी अवजड वाहनांना बंदी असेल. १६ टन आणि त्यापेक्षा जास्त वजन क्षमतेची जड वाहनं, ट्रक, मल्टी अॅक्सल ट्रेलरना वाहतुकीसाठी बंदी असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. हा दिवस यावर्षी धुमधडाक्यात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांकडून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या लोकांची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी पहिला मार्ग हा सातारा-कोल्हापूरकडून येणार आहे. सातारा, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, नातेखिंड मार्गे स्वत:ची वाहने घेऊन येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोंझर-१ आणि कोंझर २ इथे वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे.