ना पाय ना हात..... पण जिद्द हिमालयाएवढी !

    24-May-2023
Total Views |
upsc result Suraj Tiwari Mainpuri

उत्तर प्रदेश : केंद्रीय लोकसेवा आयोगाने दि. २३ मे रोजी नागरी सेवा परीक्षांचे निकाल जाहीर केले. देशात जवळपास हजारांहून अधिक परीक्षार्थी या परीक्षेला बसले होते. उत्तर प्रदेशातील सूरज तिवारी हादेखील त्यापैकीच एक. उत्तर प्रदेशातील मैनपूरी येथील रहिवासी आहे. सूरजने युपीएससी परीक्षेत देशात ९१७ वा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे त्याने हे यश आपल्या पहिल्या प्रयत्नातच मिळविले आहे. सूरज हा दिव्यांग असून त्याला दोन पाय नाहीत, त्याला एक हात नाही, मात्र त्याने मेहनत करत आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे यश संपादित केले आहे. मेहनत आणि संघर्ष करण्याची जिद्द यामुळेच त्याला हे यश मिळविता आले आहे.

दरम्यान, २०१७ मध्ये सूरजने एका अपघातात पाय आणि हात गमावले होते. तो एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील मैनपूरी येथे टेलरिंगचा व्यवसाय करतात. यंदाच्या युपीएससी परीक्षेत देशातून पहिल्या दहाजणांमध्ये सहा मुलींचा समावेश आहे. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.