आदित्य ठाकरेंसोबत पांढऱ्या कुर्त्यात फिरणारा 'तो' गुंड कोण?

    24-May-2023
Total Views |
 
Aaditya Thackeray
 
 
मुंबई : आदित्य ठाकरे नागपुर दौऱ्यावर असताना सोबत गुंड घेऊन गेला होता. कारण काय? गुंड का पाळले आहेत? अशा चर्चा सध्या सुरु आहेत. नागपूर दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत मकोकाचा आरोपी होता. माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी २३ मे रोजी नागपूर जिल्ह्यातील नांदगाव आणि वराडा या गावांना भेट देऊन प्रदूषण पीडित शेतकऱ्यांची भेट घेतली होती.
 
 
aaditya
 
 
नांदगाव मध्ये आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रीतम कापसे नावाचा ठाकरे गटाचा युवा सेना जिल्हाप्रमुख त्या ठिकाणी उपस्थित होता. पांढरा कुर्ता घातलेला हातात मोबाईल धरलेला तरुण तिथे होता. प्रीतम कापसे विरोधात हत्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो मकोकाचा आरोपी आहे. सध्या तो जामिनावर बाहेर असून काही दिवसांपूर्वीच त्याला ठाकरे गटात युवा सेना मध्ये जबाबदारी मिळाली आहे. असे समजते आहे.
 
त्यामुळे, उद्धव ठाकरेंना बारसुला जाताना सोबत गुंड लागतात. आदित्य नागपूरला गेला तेव्हाही सोबत गुंड घेऊन का गेला होता? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे. यावरुम ठाकरे गटाकडुन काय उत्तर मिळेल. हे पहावं लागणार आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.