12th Exam Result : इथे पहा बारावी बोर्डाचा निकाल!

    24-May-2023
Total Views |
12th Board Exam Result

पिंपरी
: करिअर घडविण्याचा वाटा निवडण्यासाठी लक्ष लागून राहिलेल्या बारावीचा निकाल गुरुवारी (दि. २५) जाहिर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी वेगवेगळया पाच संकतेस्थळ देण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागाचा निकाल जाहिर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून असलेली निकालाची प्रतिक्षा संपली आहे.

अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना त्याचा वापर करावा, असे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होणार आहेत. त्याची प्रिंट आउट घेता येईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

या संकेतस्थळांवर पहाता येणार ऑनलाईन निकाल

mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.