मुंबई : 'खुपते तिथे गुप्ते' च्या पुढीलभागात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत अवधूत गुप्ते घेत आहेत. या मुलाखतीत ते राज ठाकरे याना प्रश्न विचारणार आहेत. ही मुलाखत ४ जूनला रात्री ९ वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे. या मुलाखतीच्या प्रोमो मध्ये राज ठाकरे आपल्या गतकाळातील आयुष्याविषयी बोलताना दिसतात.
अवधूत गुप्ते प्रश्न विचारतात, "काय वाटतं? सगळे एकत्र असताना, कसे दिवस होते?" त्यावर उत्तरादाखल बोलताना राज ठाकरे म्हणाले, "खूप छान दिवस होते ते! माहित नाही मला कुणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली." यावर अवधूत यांनी प्रतिप्रश्न सुद्धा केला आहे.
अवधूत गुप्ते यांनी लगेच विचारले, "मग परत ते दिवस येऊ शकत नाहीत का?" परंतु याचे उत्तर पाहण्यासाठी तुम्हाला संपूर्ण मुलाखत पाहावी लागेल.
या प्रोमो व्हिडिओवर अनेकांनी अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकाने म्हंटले आहे, ""झेंडा" चित्रपटात राजेश सरपोतदार खलनायक म्हणून दाखवणारा चित्रपट दिग्दर्शक आता असले हळवे प्रश्न विचारतोय ?" तर अजून एकजण म्हणतो, "लवकर एकत्रीत या नाही तर हे कोल्हे कुत्रे महाराष्ट्र चे तुकडे करतील."