मला राहुल गांधींना पंतप्रधान करायचंयं : नाना पटोले
22-May-2023
Total Views | 36
मुंबई : " मला देशाचे पंतप्रधान राहुल गांधी यांना करायचे आहे, असे वकतव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले. ते सोलापूर येथील भाषणात म्हणाले, आधी राहुल गांधींना खासदार करुयात त्यानंतर पंतप्रधानसुध्दा करू, असा निर्धार त्यांनी केला. तसेच कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, ही काँग्रेस पक्षाची लढाई आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसची महत्त्वाची भूमिका होती. गेल्या ७५ वर्षांत काँग्रेस पक्षाने बरेच काही केले असल्याचा पुनरूच्चार नाना पटोलेंनी यावेळी केला. ७५ वर्षांत तुम्हीसुध्दा राहिलात, असे म्हणत नाना पटोलेंची भाजपवर अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी यावेळी केली.