मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या विधानाला ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीतील तिन्ही मित्रपक्षांची डीएनए चाचणी करूया, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना, "राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीत मोठा भाऊ आहे", असा दावा त्यांनी केला होता. त्यावर मविआतील नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पक्ष वाढविण्यासाठी अशी वकतव्ये कार्यकर्त्यांसमोर करावी लागतात, असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी अजित पवारांना लगावला. त्यामुळे पुन्हा एकदा मविआतील अंतर्गत धुसफूस बाहेर येताना दिसत आहे.
तसेच आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, भाजपने निवडणूक जाहीर करावी, आम्ही त्यांनी ६० जागांवर ऑल आऊट करू, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे राऊतांनी भाजपाला निवडणूक घेण्याचे जाहीर आव्हान दिल्याचे पहायला मिळाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.