तीन गाण्यांचे तीन लाख! इंदुरीकर महाराजांना गौतमीनं दिलं उत्तर

    05-Apr-2023
Total Views | 126
dancer-gautami-patil-reaction-on-indurikar-maharaj-statement

सोलापूर : इंदुरीकर महाराज यांनी काहीदिवसापुर्वी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर टीका केली होती. गौतमी पाटील तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये घेते. आम्ही फक्त ५ हजार वाढवून मागितले बाजार मांडल्याचा आरोप होतो, अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली होती. इंदुरीकर महाराज यांच्या या टीकेवर गौतमी पाटील हिने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. पण आता गौतमी पाटीलने इंदुरीकर महाराजांच्या टीकेला उत्तर दिले आहे. मी इंदुरीकर महाराजांन विषयी काय बोलणार.फक्त तुम्ही गैरसमज करून घेऊ नका.महाराज सांगतात तेवढ मानधन आम्हाला मिळत नाही. मी तिन गाण्याला तीन लाख रुपये घेतले असते तर लोकांनी माझ्या कार्यक्रमाचे आयोजनच केले नसते. आमच्या टीममद्ये ११ मुली असतात. तसेच २० जणांची आमची टीम आहे. त्यामुळे आमचा खर्च थोडा जास्त असते.पण महाराज सांगतात तेवढे मानधन आम्ही घेत नाही. आणि तीन गाण्यासाठी तीन लाख रुपये कोणीही देणार नाही, असं गौतमी पाटील म्हणाली आहे.

तसेच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा होतो. मुलांचे ढोपर फुटतात. पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागतो. गौतमीला संरक्षण दिलं जातं. आम्हाला संरक्षण नसतं, अशी टीका इंदुरीकर महाराज यांनी केली होती.पण त्याबद्दल गौतमी पाटीलने कोणतेच विधान केले नाही. मात्र दरम्यान या प्रकरणावर सोशल मीडियातून इंदुरीकर महाराज यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.


अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121