आता मराठीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये देता येणार CRPF कॉन्स्टेबल भरती परीक्षा!

- केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली मान्यता

    15-Apr-2023
Total Views |
 
Amit Shah
 
 
नवी दिल्ली : सीआरपीएफमध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. सीआरपीएफ भरती परीक्षा राज्यातील तरुणांना आता मराठी भाषेत देणं शक्य होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएफ भरतीसाठी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १३ प्रादेशिक भाषांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) परीक्षा आयोजित करण्यास मान्यता दिली आहे.
 
भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त कोकणी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी भाषेत घेतली जाणार आहे. गृह मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लाखो उमेदवारांना त्यांच्या प्रादेशिक भाषेतून परीक्षेत भाग घेता येणार आहे. त्यामुळे त्यांची निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. कॉन्स्टेबल परीक्षा ही स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे आयोजित प्रमुख परीक्षांपैकी एक आहे. ज्यामध्ये देशभरातून लाखो उमेदवार भाग घेतात.
 
हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त १ जानेवारी २०२४ पासून १३ प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. गृह मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मंत्रालय प्रादेशिक भाषांच्या वापर आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121