संजय राऊत हक्कभंग प्रकरण : भूमिका मांडण्यासाठी वेळेची मागणी

राऊतांचे विधिमंडळाला पत्र

    08-Mar-2023
Total Views |
 
Sanjay Raut rights violation case
 
मुंबई : संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' असं म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणला होता. विधिमंडळाने संजय राऊतांना ४८ तासांमध्ये आपलं म्हणणं लेखी मांडण्याची नोटीस दिली होती. शुक्रवारी ३ मार्च रोजी संध्याकाळी संजय राऊतांची खुलासा सादर करण्याची मुदत संपली होती. मात्र आज त्यांनी आपलं उत्तर सादर केलं आहे.
 
आपण केलेलं विधान हे विधीमंडळाला नाहीतर विशिष्ट गटाला उद्देशून बोललो आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा संजय राऊतांनी दावा केला आहे. विधीमंडळाचा अवमान केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी नोटीस बजावण्यात आली होती.
''सभागृहाचा अवमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. मी केलेले वक्तव्य हे विधिमंडळातील त्या एका गटासाठी केले होते. भूमिका स्पष्ट करण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात यावी.'' अशी राऊतांनी विधिमंडळाकडे मागणी केली.
 
संजय राऊत यांनी नोटीसीला उत्तर देताना म्हटलं की, मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्य गटापुरतं होतं. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासू पाहावं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.