नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळा : लालू यादव यांची सीबीआय चौकशी

    07-Mar-2023
Total Views |
lalu-prasad-yadav-interrogation-cbi-rabri-devi


नवी दिल्ली
: जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सीबीआयच्या पथकाने मंगळवारी सुमारे पाच ते सहा चौकशी केली.
 
सीबीआयने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायालयाने लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांसह इतर आरोपींना १५ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. प्रकरणाच्या पुढील तपासाचा भाग म्हणून लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे. यादव यांच्या कुटुंबीयांकडून आणखी काही कागदपत्रांचीही मागणी सीबीआय करणार आहे.

 
याप्रकरणी सीबीआयने सोमवारी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची पाटणा येथील निवासस्थानी चौकशी केली होती. सीबीआयने राबडी देवी यांना नोटीस बजावली होती, त्यानंतर त्यांनी सोमवारी उपलब्ध असल्याचे सांगितले होत. त्यानंतर सीबीआयच्या पथक चौकशी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. यावेळी राबडी देवी यांचीही सुमारे चार तास चौकशी करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण ?

हे प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान रेल्वे मंत्री असताना लालू प्रसाद यांच्या कथित 'ग्रुप-डी' नोकरीशी संबंधित आहेय यामध्ये त्यांनी त्यांच्या कुटुंबाला जमीन भेट देऊन किंवा विकत घेऊन नोकरी दिली होती. याप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की 2004-2009 दरम्यान मुंबई, जबलपूर, कोलकाता, जयपूर आणि हाजीपूर येथे असलेल्या रेल्वेच्या विविध झोनमध्ये काही व्यक्तींना ग्रुप-डी पदांवर नियुक्त करण्यात आले होते. त्या बदल्यात त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी यादव कुटुंबास ए. के. इन्फोसिस्टीम कंपनीच्या नावे जमीन दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.