अॅवलॉन टेक्नॉलोजीचा ३ एप्रिल रोजी आयपीओ येणार

    30-Mar-2023
Total Views | 84
Avalon Technology's IPO will be held on April 3


मुंबई
:इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्या अॅवलॉन टेक्नॉलोजी लिमिटेड कंपनीतर्फे आयपीओ सादर केला जाणार आहे. दोन रुपये दर्शनी किमतीचे एकूण ८६५ कोटी समभाग जाहीर केले जाणार आहेत. सोमवार, दि. ३ एप्रिल रोजी जाहीर होणाऱ्या हा आयपीओ शुक्रवार, दि. ३१ मार्चपासून अँकर इनेव्हेस्टरसाठी तर ३ ते ६ एप्रिलपर्यंत खुल्या बाजारपेठेत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध होणार आहे. प्रत्येक समभागासाठी ४१५ ते ४३६ रुपये प्राईस बँड असून प्रत्येकी ३४ शेअर एका गुंतवणूकीद्वारे मिळणार आहेत.

नव्याने केलेल्या गुंतवणूकीद्वारे कर्ज परतावा, तसेच ९० कोटी खेळत्या भांडवलासाठी उर्वरित रक्कम इतर कार्यालयीन कामकाजासाठी राखीव आहे. अॅवलॉन टेक्नॉलोजीचा शेअर दोन्ही एनएसई आणि बीएसई या दोन्ही निर्देशांकांमध्ये आयपीओ सादर करत आहे. नुकतेच कंपनीने १६० कोटींची प्रीआयपीओ प्लेसमेंट पूर्ण केली आहे. ज्यात ८० कोटी फ्रेश इश्यू तर उर्वरित ८० कोटी सेकंडरी शेअर्स असणार आहेत. कंपनीने UNIFI Financial Pvt Ltd आणि Ashoka India Equity Investment Trust Plc प्रत्येकी ६० कोटी India Acorn Fund Ltd तर्फे ४० कोटी रुपये प्राप्त केले आहेत. जानेवारीतच कंपनीला सेबीतर्फे हिरवा झेंडा मिळाला होता.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121