तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल असे पुरावे माझ्याकडे आहेत, राऊत यांचा गंभीर इशारा

    18-Mar-2023
Total Views |
 
Sanjay Raut
 
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अनिक्षा जयसिंघानी प्रकरणात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फरार बुकी अनिल जयसिंघानी यांच्यासोबतचा फोटो समोर आला. आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान यावरून राऊतांनी "आमच्यावर झालेले आरोप खरे आणि तुमच्यावर झालेले आरोप खोटे काय? तुमचे कुटुंब तुरुंगात जाईल असे पुरावे आमच्याकडे आहेत. मला तोंड उघडायला लावू नका. नाही तर महाराष्ट्रात स्फोट होतील." असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. राऊतांनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर उपमुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देतील हे पाहणं महत्वाचं ठरेल.
 
संजय राऊत नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, "फोटोचं राजकारण काढलं तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीयांचे कुणाकुणाबरोबर फोटो आहेत. तेही बाहेर येतील. आमच्यावर संस्कार आहेत. कुणाच्याही कुटुंबापर्यंत जायचं नाही. कुटुंबाला त्रास होईल, कुटुंबातील कुणी तुरुंगात जाईल असं दळभद्री राजकारण आम्ही केलं नाही. पण ही कटुता फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणली. केंद्रात मोदी आणि शाह यांनी आणली. आजही एकनाथ खडसे यांचे जावई तुरुंगात आहेत. त्याचं उत्तर महाजन, फडणवीस यांनी दिलं पाहिजे. आम्ही तुरुंगात गेलो. देशमुख तुरुंगात गेले. मलिक तुरुंगात आहेत. काय कारणं काय आहेत? " असा आरोप संजय राऊत यांनी केला.
 
शिंदे स्वत:ला मुख्यमंत्री मानतात का?
 
कोकणातील खेड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. ज्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. तिथेच शिंदे यांची सभा होत आहे. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, "महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत? महाराष्ट्र त्यांना मुख्यमंत्री मानत नाहीत. पण एकनाथ शिंदे हे तरी स्वत: ला मुख्यमंत्री मानतात का? शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते बघायला फिरा. सभा कसल्या घेता? सभा घेऊन काय मिळणार आहे? आम्ही तुम्हाला नेस्तानाबूत करू. जोपर्यंत खुर्चीत आहात तोपर्यंत शेतकऱ्यांचं काम करा." असं ते म्हणाले.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.