समाजमाध्यमात ‘फॉलोअर्स’च्या अमिषाचा बळी!

    13-Mar-2023
Total Views |
Social Media Followers
  • समाजमाध्यमांवरील ‘रिल्स’च्या माध्यमातून मैत्री


  • ‘फॉलोअर्स’ वाढवण्याचे अमिष दाखवत पैशांची मागणी


  • वडिलांच्या बँक खात्यातून ५५ हजार, १२८ रुपये लंपास


  • ‘फॉलोअर्स’ संख्या वाढली नसल्याने फसवणुकीचा संशय
मुंबई : समाजमाध्यमांवर ‘फॉलोअर्स’ वाढवण्याच्या आमिष दाखवत गोरेगाव येथील व्यावसायिकाची ’सायबर’ फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांकडून तपास करण्यात येत असून या व्यावसायिकाची १६ वर्षांची मुलगी वडिलांच्या मोबाईल फोनचा वापर करत असताना आरोपीकडून ही फसवणूक करण्यात आली आहे.

यात पीडितेच्या वडिलांनी ‘बँक बॅलन्स’ तपासला असता फक्त ०.०८ रुपये शिल्लक असल्याचे समजले. त्यांनी त्यांच्या मुलीकडे चौकशी केली, तेव्हा तिने संपूर्ण घटना सांगितली. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी फसवणूक करणार्‍याच्या नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला, जो सतत बंद होता. अखेर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि वनराई पोलीस ठाण्यात गुन्हाची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.