"अब तेरा क्या होगा अनिल परब?", भाजप नेत्याचं ट्विट, परब गोत्यात!

अनिल परब गोत्यात येणार! ईडीने सहकाऱ्यालाच उचलले!

    10-Mar-2023
Total Views |
दापोली साई रिसॉर्ट प्रकरण अनिल परब यांच्या अंगलट येणार का? 


Anil Parab

मुंबई : दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने व्यावसायिक सदानंद कदम यांना ताब्यात घेतले आहे. उबाठा गटाचे नेते अनिल परब यांचे ते जवळचे सहकारी मानले जातात. अनिल परब यांनी दापोली साई रिसॉर्टचा व्यवहार हा कॅशमध्ये सदानंद कदम यांच्यासोबत केला असल्याची प्रार्थमिक माहिती ईडीकडे आहे. यामुळेच ही कारवाई केली जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिलेल्या सूचक प्रतिक्रीयेमुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता खेड येथील साई रिसॉर्टमध्ये ईडीचे पथक दाखल झाले. त्यानंतर रामदास कदम यांचे सख्खे बंधू सदानंद कदम यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी आता मुंबईतील ईडी कार्यालयात होणार आहे. ईडी चौकशीसाठी सदानंद कदम यांना घेऊन जात असल्याची प्रार्थमिक माहिती आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट घोटाळ्या प्रकरणातील ही कारवाई आहे.

सकाळी ईडीचे पथक भरणे नाका येथील रिसॉर्टवर दाखल झाले. सदानंद कदम यांना चौकशीसाठी ताब्यात घेत असल्याची सूचना ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. कदम यांच्याकडून विचारणा केली असता प्रार्थमिक चौकशीसाठी आपण ताब्यात घेत आहोत, अशी माहिती देण्यात आली आहे. कदम यांना मुंबईला हलवण्यात येणार असून त्यांना चौकशीनंतर न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.

दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यावर संशयाची सुई आहे. कदम यांनी परब यांच्याकडून कोट्यवधींच्या रक्कमेत रिसॉर्ट विकत घेतले होते. अनिल परब यांच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ट लागल्यानंतर कदम यांच्या चौकशीसाठीही ईडीचे अधिकारी आग्रही होते. त्या संदर्भात वारंवार नोटीसा पाठविल्यानंतरही कदम यांनी उत्तर दिलेले नव्हते. मात्र, अखेर कदम यांना आज ईडीतील अधिकाऱ्यांनी थेट गाठून चौकशीसाठी ताब्यात घेतले. या प्रकरणावर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही सूचक प्रतिक्रीया दिली आहे. ईडीने दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना ताब्यात घेतले, अब तेरा क्या होगा अनिल परब?, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.