राजन साळवी यांच्यावर बेकायदा संपत्ती जमावल्याचा आरोप
22-Feb-2023
Total Views | 116
5
मुंबई : एसीबीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून राजन साळवी यांनी २००९ पासून केल्याला कामाचा तपशील मागवला होता खर्च केलेला निधी, कंत्राटदाराचं नाव, कामाची रक्कम, कामांची तारीख आणि बिल अदा केल्याची तारीख याबाबतची माहिती मागवण्यात आली होती. दरम्यान आमदार राजन साळवी लाच लुचपत कार्यालयात बुधवारी उपस्थित होते. साळवी तिसऱ्यांदा चौकशीसाठी अलिबाग लाच लुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
दरम्यान, आमदार राजन साळवी याच्या स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांचीही मालमत्तेबाबत चौकशी करण्यात आलेली आहे. आज बुधवारी दुपारी बारा वाजता आमदार साळवी यांनी अलिबाग कार्यालयात हजर राहून कागदपत्र सादर केली आहेत. त्यामुळे यानंतर आमदार साळवी याच्या अडचणी वाढणार का? हे चौकशी नंतर समोर येणार आहे.