अंतिम निकालापूर्वी काँग्रेसचे अभिनंदन केल्याबद्दल निवडणूक आयोगाने डीजीपीला केले निलंबित!

- इतर २ वरिष्ठ पोलिसांना बजावली नोटीस

    04-Dec-2023
Total Views | 67
 
Anjani Kumar
 
 
तेलंगणा : निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. अंतिम निवडणूक निकाल ECI द्वारे घोषित होण्यापूर्वीच डीजीपीने काँग्रेसच्या एका नेत्याला भेटून अभिनंदन केले होते.
 
निवडणूक आयोगाने वरिष्ठ पात्र पोलीस अधिकाऱ्याला तेलंगणा डीजीपी म्हणून ताबडतोब पदभार स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत. निलंबित करण्यात आलेले डीजीपी अंजनी कुमार यांनी काँग्रेसचे तेलंगणा प्रमुख रेवंत रेड्डी यांना अभिवादन केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
 
 
काँग्रेस प्रमुखांची भेट घेत असताना कुमार यांच्यासोबत तेलंगणाचे राज्य पोलीस अधिकारी संजय जैन आणि महेश भागवत होते. डीजीपीला निलंबित करण्याव्यतिरिक्त, मतदान पॅनेलने महेश भागवत आणि संजय जैन यांनाही नोटीस बजावल्या आणि मतमोजणी सुरू असताना निवडणूक उमेदवाराला भेटल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांनी रविवारी रात्री ८ वाजेपर्यंत नोटिसांना उत्तर देणे अपेक्षित होते.
 
 
टाईम्स ऑफ इंडियाच्या पत्रकार भारती जैन यांनी ट्विट केले की, “राज्यात मतमोजणी सुरू असतानाही EC ने तेलंगणाचे डीजीपी अंजनी कुमार यांना राज्य काँग्रेस प्रमुख रेवंत रेड्डी यांना जाऊन भेटल्याबद्दल निलंबित केले. मतदान प्रक्रियेदरम्यान पक्षपात न ठेवण्यासाठी ही कारवाई एक कठोर संदेश आहे.”
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121