मुंबई : आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे आणि ठाकरेंच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली. प्रतिज्ञापत्राला अर्थ नाही, फेरसाक्ष प्रत्यक्षात व्हावी. लेखी कागदपत्राद्वारे साक्ष दिली जाऊ शकत नाही. असं शिंदेंच्या वकिलांनी म्हटलं आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटांवर नाराजी व्यक्त केली. वकील जेठमलानी आणि कामत यांच्यात वैयक्तिक टीकाटिप्पणी सुरू होती. यावेळी वैयक्तिक टीकाटिप्पणी नको, मुद्दा कायदेशीररित्या मांडा. असं अध्यक्षांनी बजावलं.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होत आहे.विधानसभा अध्यक्षस राहुल नार्वेकर यांच्या समोर दोन्ही गटाकडून बाजू मांडली आहे. या सुनावणी दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली. शिवसेनेत पडलेल्या फुटीवेळी पक्षाने पाठवलेल्या नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रांची कात्रणं, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे आभार मानण्यासाठी केलेल्या पोस्ट हे सर्व पुरावे म्हणून ठाकरे गटाकडून सादर केले गेले आहेत.