मुंबई : अहमदाबाद येथे रविवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना पाहण्यासाठी मध्य रेल्वेने क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी क्रिकेट विश्वचषक स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्र. ०११५३ छशिमट-अहमदाबाद विशेष एक्स्प्रेस शनिवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी छशिमट येथून रात्री १०.३० वाजता सुटेल आणि रविवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.४० वाजता अहमदाबादला पोहोचेल. तर ट्रेन क्र. ०११५४ अहमदाबाद- छशिमट स्पेशल एक्स्प्रेस अहमदाबादहून दि. २० नोव्हेंबर (रविवार/सोमवारच्या मध्यरात्री) रोजी १.४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सोमवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३५ वाजता छशिमट येथे पोहोचेल.
थांबे- छशिमट, दादर, ठाणे, वसई रोड, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद.
डब्यांची स्थिती : १७ एलएचबी डब्बे - एक एसी-फर्स्ट क्लास, तीन एसी-2 टियर, 11 एसी-3 टियर. एक सेकंद सीटिंग कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि एक पॉवर कार आजपासून म्हणजेच शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबरपासून या विशेष ट्रेनसाठी आरक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.