टीम इंडियाला मोठा धक्का; किंग कोहली अर्धशतक ठोकून माघारी

    19-Nov-2023
Total Views |
Virat Kohli Bowled out

गांधीनगर :
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ५४ धावा करून माघारी परतला. विराटने ६३ चेंडूत ५४ धावांची खेळी करताना ४ चौकारांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिंसने त्याला त्रिफळाचित केले. विराट बाद झाल्यानंतर भारताचा खेळ ३१  षटकांपर्यंत ४ बाद १५८ धावा झाल्या आहेत.

दरम्यान, भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. . भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक अंदाजात फलंदाजी करत त्याने ३१ चेंडूंमध्ये ४७ धावावर असताना मॅक्सवेलच्या बॉलिंगवर उंच फटका मारताना बाद झाला. रोहितच्या रुपात भारताला मोठा झटका बसला आहे. श्रेयश अय्यर ३ चेंडूत ४ धावा करत बाद झाला. त्याने फक्त १ चौकार या खेळीत मारला.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मैदानात रविवारी दि. १९ नोव्हेंबर २ वाजता सामन्याला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिली विकेट गमावली आहे. शुभमन गिल अवघ्या ४ धावा करुन बाद झाला. त्याची विकेट मिचेल स्टॉर्कने घेतली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक अंदाजात फलंदाजी करत आहे. रोहितने २० चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने दोन षटकार मारले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.