रोहित शर्माच्या नावावर आणखी एक नवा विक्रम

    19-Nov-2023
Total Views |
Indian Captain Rohit Sharma New Record

गांधीनगर :
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुध्द वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द आतापर्यंत २३५७ धावांचा टप्पा ओलांडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुध्द वनडेमध्ये सर्वाधिक धावा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने केलेल्या आहेत. त्याने ३, ०७७ धावा केल्या आहेत.

दरम्यान, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम मैदानात रविवारी दि. १९ नोव्हेंबर २ वाजता सामन्याला सुरुवात झाली असून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १९६ धावा केल्या आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक अंदाजात फलंदाजी केली. रोहितने ३१ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या आहेत. त्याने चार चौकार आणि तीन षटकार मारले आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.