वसीम अकरमने सिकंदर बख्तला दिला घरचा आहेर; मला लाज वाटत आहे...

    18-Nov-2023
Total Views |
Wasim Akram on Sikander Bakht Objection
 
नवी दिल्ली : पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अकरमने सिकंदर बख्तच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला असून तो म्हणाला, नाणेफेक करताना कोणतेही विशिष्ट नियम नाहीत त्यामुळे बख्तच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे अकरमने यावेळी म्हटले आहे. तसेच, वसीम अकरमने पुढे स्पष्ट केले की, तेथे ठेवलेली मॅट केवळ प्रायोजकत्वासाठी आहे, त्यामुळे अशा बिनबुडाच्या आरोपांनी सिकंदर बख्त यांनी लाज काढल्याचे अकरम यावेळी म्हणाले.

दरम्यान, वसीम अक्रम म्हणाला, नाणे कुठे पडायचे कोण म्हणाले? त्याने नाणे तिथे फेकले असे कोणी म्हटले? ते प्रायोजकत्वासाठी असून तो कुठे जाऊ दे त्यामुळे मला लाज वाटत आहे, असे अकरम यांनी सांगितले. विशेष म्हणजे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने नाणे टॉसमध्ये रोहित शर्मावर फिक्सिंगचा आरोप केल्यावर तो चर्चेत आला. बख्तच्या या कट सिद्धांताने माजी पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रम यांनाही आश्चर्यचकित केले.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने भारतीय कर्णधार रोहित शर्मावर नाणेफेकीत हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे. सिकंदर बख्तच्या या आरोपावर वसीम अक्रमने जोरदार टीका केली आहे. सिकंदर बख्तने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मावर आरोप करून वाद निर्माण केला आहे.

दरम्यान, बख्तच्या म्हणण्यानुसार, २०२३ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकादरम्यान, रोहित शर्माने नाणेफेकीच्या वेळी विरोधी कर्णधारापासून मुद्दाम नाणे फेकून संशयास्पद वागणूक दाखवली. या कृतीमुळे विरोधी कर्णधाराला नाणेफेकीचा निकाल पाहण्यापासून रोखले जाते, असे बख्तचे म्हणणे आहे. भारताच्या बाजूने निकालावर प्रभाव टाकण्याची ही रणनीती असू शकते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.