मुंबई : महाराष्ट्रात दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत, असे होऊ देऊ नका. कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. असा मी शब्द देतो. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ओबीसी आरक्षणावरून जालन्यात एल्गार सभा आयोजित केली होती. यात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर जरांगे पाटलांकडून प्रत्तयुत्तर देण्यात आले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मराठा समाजाला सरकार आरक्षण देणार आहे, तसा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. हे करताना कोणावरही अन्याय होणार नाही. ओबीसी समाजाला मी याबाबत आश्वस्थ करतो. महाराष्ट्रात दोन समाज एकमेकापुढे उभे आहे, असे चित्र निर्माण होणे योग्य नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी." असं ते म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमातून लोकांच्या दारापर्यंत आरोग्य सेवा पोहचणार असून ही योजना नागपूरमध्ये राबवली जाणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.